गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थित संपन्न
गोंदिया. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, रेलटोली, गोंदिया येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. पालकमंत्री ना.श्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या गोंदिया येथे प्रथम आगमन निमित्त भव्य स्वागत करण्यात आले. सदर बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांनी पक्ष संघटन, आगामी निवडणूकाची तयारी, बूथ कमिटीचे सशक्तीकरण, विविध समित्यांवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत विचार व्यक्त केले.
श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले की, खा. श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्न चालू आहेत. गोंदिया जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी कार्य करणारे माननीय श्री पटेल हे येणाऱ्या दिवसात राज्याचे वित्त मंत्री, मुख्यमंत्री व अन्न पुरवठा मंत्री सोबत लवकरात लवकर धान खरेदी केंद्र चालू करणे व धानाला बोनस देण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. तसेच पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करणे व मेडिकल कॉलेज इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी श्री जैन यांनी केली.
याप्रसंगी पालकमंत्री श्री आत्राम म्हणाले कि, गोंदिया जिल्ह्याला लाभलेले नेतृत्व श्री पटेलजी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्याचे काम निश्चितच करणार याची ग्वाही दिली. श्री पटेल जी सतत शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्नांचा सरकार कड़े पाठपुरावा करित असतात. जलसिंचनाच्या सोयी, गोंदिया येथे मेडिकल कॉलेज, बिरसी विमानतळ, अदानी प्रकल्प यासारखे अनेक विकासात्मक कामे श्री प्रफुल पटेल साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, डा अविनाश जयसवाल, अजय गौर, प्रभाकर दोनोडे, केनत तुरकर, विशाल शेंडे, रफिक खान, यशवंत गणवीर, सुरेश हर्षे, पुजा अखिलेश सेठ, सुधा राहांगडाले, बालु बावनथडे, किरण पारधी, अश्विनी पटले, अजय उमाटे, कुंदन कटारे, सि के बिसेन, बालकृष्ण पटले, केवल बघेले, लोकपाल गहाने, प्रेमकुमार रहांगडाले, अविनाश काशीवार, कमलबापु बाहेकार, सुशिला हलमारे, आम्रपाली डोंगरवार, शंकर टेंभरे, किशोर तरोने, गोपाल तिवारी, घनश्याम मस्करे, अखिलेश सेठ, रजनी गिरीपुंजे, माधुरी नासरे, दुर्गा तिराले, कविता रहांगडाले, रवि पटले, विनोद पंधरे, अशोक सहारे, करण टेकाम, सुशीला भालेराव, पुष्पलता दुर्गकर, आशा पाटिल, सरला चिखलोंडे, नरेश कुंभारे, विनीत सहारे, विजय रगडे, सुनिल भालेराव, सोमेश रहांगडाले, डी यु रहांगडाले,संदीप मेश्राम, टिकाराम मेंढे, लवली होरा, रवी मुंदडा, राजेश गणेरीया, मनोहर वालदे, जगदिश बाहेकार, शंकर सहारे, मदन चिखलोंडे, राजेश तुरकर, लिकेश चिखलोंडे, हरबष गुरनानी, जिम्मी गुप्ता, लखन बहेलिया, वेनेश्वर पंचबुध्दे, पदमलाल चौरीवार, धर्मराज कटरे, रमेश कुरील, बंटी चौबे, नितीन टेंभरे, दिलीप डोंगरे, सुरेंद्र रहांगडाले, कृष्णकुमार बिसेन, खुशाल वैद्य, नासीर घानीवाल, श्यामकुमार फाये, धर्मेंद्र गणवीर, सयाराम भेलावे, प्रभुदयाल फरकुंडे, हर्षवर्धन मेश्राम, सुनिल पटले, शैलेष वासनिक, पिंटु बनकर, बबलु ढोमने, संजय डोये, विनोद चुटे, पन्नालाल डहारे, महेश तांडेकर, संजय शेंडे, रमेश रहांगडाले, हौसलाल रहांगडाले, उमेश ठाकरे, राकेश वर्मा, डॉ रशिद, हरीराम आसवानी, अलकेश मिश्रा, किशोर पारधी, मनोहर राउत, हेमराज डाहाके, नानू मुदलियार, तिलकचंद पटले, जितेंद्र बिसेन, आनंद ठाकुर, दानेश साखरे, भोजराज चौव्हान, खालीद पठान, लालचंद चौव्हान, घनेश्वर तिरेले, तुषार उके, अनुज जयसवाल, राहुल शेंडे, राहुल वालदे, भगत ठकरानी, नागो बंसोड, विनायक शर्मा, चंद्रकुमार चुटे, भागेस बीजेवार, योगेश पतेह, संजीव राय, संदिप पटले, नरहरप्रसाद मस्करे, राज शुक्ला, सचिन शेंडे, प्रतिक पारधी, कपील बावनथडे, प्रमोद कोसरकर, रौनक ठाकुर, कान्हा बघेले, नरेंद्र बेलगे, कुणाल बावनथडे, शरभ मिश्रा सह सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत अध्यक्ष व सदस्य, सर्व सेल चे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.