गोंदिया। मालगाडी साठी पॅसेंजर गाडीला रेल्वे स्थानकाच्या बाहेर ताटकळत ठेवण्याच्या प्रकारामुळे संतापलेल्या प्रवाशांसोबत आज खासदार सुनील मेंढे यांनी गोंदिया रेल्वे स्थानकाला भेट दिली.
झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने त्यांनी माहिती जाणून घेतली. यापूर्वीही मालगाडी साठी प्रवाशी गाडी थांबवली जाऊ नये अशा सूचना केल्या होत्या मात्र पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाल्याने दोन प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. खासदारांनी आज प्रवासी आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रेल्वेचे डीआरएम यांच्याशी संवाद साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. यापुढे असे प्रकार होऊ नये या संदर्भात काळजी घ्यावी असे रेल्वे प्रशासनाला बजावले. प्रवासी गाडीला थांबवून ठेवण्याचा प्रकार यापुढे होणार नाही असे यावेळी रेल्वे व्यवस्थापनाने सांगितले.
यावेळी सर्वश्री गजेंद्र फुंडे, सुनिल केलंका,गुड्डू चांदवानी, जितेंद्र अग्रवाल, प्रशांत बोरकुटे, दिनेश दादरीवाल, अभय सावंत, मनोज पटनायक, राकेश अग्रवाल, जसपाल सिंग चावला, भावना कदम, शालिनी डोंगरे, सुभा भारद्वाज, दीप्ती मिश्रा, धर्मिष्ठा शेंगर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.