Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोंदिया: शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाखेबाज, मोटर सायकल चोरणारी व बनावट कागपत्रांद्वारे...

गोंदिया: शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाखेबाज, मोटर सायकल चोरणारी व बनावट कागपत्रांद्वारे विक्री करणारी टोळी जेरबंद…. 24 मोटर सायकली सह 11 लाख 45 हजार रुपयाच्या मुद्देमाल हस्तगत

 

गोंदिया। पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे , यांनी पोलीस ठाणे गोंदिया शहर व जिल्ह्यामध्ये मोटर सायकली चोरी होण्याचे व घरफोडी चे वाढते प्रमाण लक्षात घेऊन चोरी व घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे व गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देशित करून सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री.अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्री.सुनील ताजने यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. श्री.सागर पाटील यांचे नेतृत्वात गोंदिया शहर येथे दाखल मोटर सायकल चोरी व घरफोडीच्या विविध गुन्ह्यांतील गुन्हेगारांचा शोध घेवून तपास करण्यात येत होता.

पो. ठाणे गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकामार्फत जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या घरफोडी व मोटर सायकली चोरी करणाऱ्या गुन्ह्यातील गुन्हेगार, आरोपींची माहिती मिळवण्यात येत होती व त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाची शोध मोहीम सुरू होती.

पोलीस ठाणे गोंदिया शहर दाखल अप. क्रं. 706/2022 कलम 379 भा.दं.वि.गुन्ह्याचे अनुषंगाने गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटर सायकल बाबत गुन्हे प्रकटीकरण पथक माहिती काढत असताना पथकाने मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे खालील नमूद आरोपी नामे –

1) श्रीकांत उर्फ शशांक अरुण बोरकर ,वय 19 वर्ष, राहणार, पाऊलदौना, तालुका देवरी, जि. गोंदिया .

2) नाशिक उर्फ अज्जू हिरालाल राणे वय 20 वर्ष, राहणार- पाऊलदौना, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया*

3) आशिष जितेंद्र बागडे, वय 19 वर्ष, राहणार- चीचगावटोला तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया यांना ताब्यात घेवून पो. ठाणे गोंदिया शहर येथील दाखल मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मोटर सायकली बाबत सखोल विचारपूस करून तांत्रिक माहितीच्या आधारे अथक परिश्रम घेवून आरोपी यांचे कडून पो. ठाणे. गोंदिया शहर दाखल गुन्ह्यातील मोटर सायकल तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी केली असता खालील प्रमाणे दाखल पोलीस ठाणे ….

1) पोलीस ठाणे, गोंदिया शहर गुन्हा रजि.क्र. 706/2022, 709/2022, 714 /2022 , 770/2022, 777/2022 कलम 379 भादवी अन्वये 5 गुन्हे

2) पोलीस ठाणे, आमगाव गुन्हा रजि.क्र.362/2022 कलम 379 भादवी अन्वये 1 गुन्हा

3) पोलीस ठाणे, सालेकसा गुन्हा रजि. क्र.500/2022, 527/2022, कलम 379 भादवी अन्वये 2 गुन्हे

4) पोलीस ठाणे, डूग्गीपार, गुन्हा रजि.क्र.288/2022, कलम 379 भादवी अन्वये 1।गुन्हे

5) पोलीस ठाणे, देवरी गुन्हा रजिस.क्र.293/2022 कलम 379 भादवी अन्वये 1 गुन्हे अश्या प्रकारे गुन्हे प्रकटीकरण पथका कडून एकूण 10 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही आरोपीतां कडून एकूण 24 मोटर सायकली 11 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे प्रकटीकरण पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय नियोजनबद्ध व अतिशय वेगवान हालचाली करून, अथक परिश्रम घेत पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील 5 मो. सा. तसेच गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन आमगाव -3, देवरी -5, सालेकसा -4, गोरेगाव -2, डूग्गीपार -1, तसेच बालाघाट जिल्ह्यातील -4 अश्या एकूण 24 चोरी केलेल्या मोटर सायकली हस्तगत केलेल्या आहेत. पुढील तपास व कार्यवाही गोंदिया शहर पो.स्टे. चे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, यांच्या नेतृत्वातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पो.उप.नि. सैदाणे, पो. उप. नि. गिरी, पोलीस अंमलदार जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, अरविंद चौधरी, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, ओमेश्वर मेश्राम, सुबोध बिसेन, पुरुषोत्तम देशमुख, दिनेश बिसेन, कुणाल बारेवार, मुकेश रावते, विकास वेदक, रहांगडाले, दीक्षित दमाहे, प्रभाकर पालांदुरकर , महिला पोलीस अंमलदार रीना चव्हाण यांनी सदरची उत्कृष्ट कामगीरी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments