प्रतिनिधि।
गोंदिया। पोलीस ठाणे दवानिवाडा हद्दीतील साईटोला घाट वैनगंगा नदीच्या पात्रातून काही लोक बेकायदेशीरित्या विना परवाना वाळू चे उत्खनन करून गौण खनिजाची चोरी करीत आहेत अशी खात्रीशिर माहिती पोलीस अधिक्षक यांचे विशेष पोलीस पथकास मिळाल्याने दिनांक 5/12/2022 चे मध्यरात्री 3 ते पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे निर्देशान्वये व मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे नेतृत्वातील विशेष पोलीस पथकाने गौण खनिजाचे उत्खनन करून वाळू चोरी करणाऱ्या विरुद्ध धडक मोहीम राबवून दवनिवाडा हद्दीतील साईटोला घाट वैनगंगा नदीपात्र परिसरात छापा घातला असता.
1) टिप्पर क्रमांक एम.एच ३५ ए. एच. १४९९ चे चालक अमर दिगंबर बारबुदे वय ३१ वर्ष रा.दांडेगांव/ एकोडी,
2) टिप्पर क्रमांक एम.एच-३५ ए. जे. ५६९९ चे चालक महेश रामचरण शहारे, वय ३५ वर्षे रा. निलागोंदी ता.जि. गोंदिया,
3) टिप्पर क्रमांक एम.एच-३५ ए.जे. ७२९९ चे चालक रामेश्वर हरीराम सरीयाम वय ३६ वर्षे रा. नवेगांव, पो.धापेवाडा ता.जि- गोंदिया,
4) टिप्पर क्रमांक एम.एच -३५ ए.जे. २९०६ चे चालक दिनेश अनंतराम चौधरी, वय ४० वर्षे रा. नवेगांव, पो. धापेवाडा,
हे अवैधरित्या गौण खनिजा चे उत्खनन करून वाळूची चोरी करून वाहतूक करतांना मिळून आले. तसेच साईटोला वैनगंगा नदीच्या पात्रात पोकलैंड मशीन द्ववारे रेतीचे उत्खनन करतांना नदीपात्रात
5) काळया पिवळया रंगाची ह्युंडाई स्मॉर्ट प्लस रोबेक्स – २१५ पोकलैंड मशीन *चालक* – यशवंत रमेश सोनवाणे, वय ३५ वर्ष, रा. सी. जे. पटेल कॉलेज च्या समोर तिरोडा
6) पिवळया रंगाची ह्युंडाई स्मॉर्ट प्लस रोबेक्स – २१५ एल कंपनीचे पोकलँड मशीन
चालक – रवीन्द्र दसारामजी शहारे वय २६ वर्षे रा. लोहारा पो. सालेगाव ता. आमगांव मिळून आल्याने पोकलैंड मशीनसह ताब्यात घेण्यात आले.
सदर प्रकरणी आरोपी टिप्पर चालक १) अमर दिगंबर बारबुदे वय ३१ वर्ष रा. दांडेगांव/ एकोडी,ता.जि. गोंदिया, २) महेश रामचरण शहारे, वय ३५ वर्षे रा. निलागोंदी ता.जि. गोंदिया, ३) रामेश्वर हरीराम सरीयाम वय ३६ वर्षे रा. नवेगांव, पो. धापेवाडा ता.जि-गोंदिया, ४) दिनेश अनंतराम चौधरी, वय ४० वर्षे रा. नवेगांव, पो. धापेवाडा, ता.जि. गोंदिया, आणि पोकलैंड मशीन चालक ५) यशवंत रमेश सोनवाणे, वय ३५ वर्ष, रा.सी.जे. पटेल कॉलेजच्या समोर तिरोडा ता. तिरोडा जि. गोंदिया, ६) रवीन्द्र दसारामजी शहारे वय २६ वर्षे रा. लोहारा पो. सालेगाव ता. आमगांव जि. गोंदिया हे अवैधरित्या रेती उत्खनन करुन रेती चोरी करुन वाहतूक करतांनी मिळून आल्याने व टिप्पर क्रमांक एम.एच-३५ ए.जे. – ५६९९, टिप्पर क्रमांक एम.एच-३५ ए.जे. ७२९९ व पिवळ्या रंगाची ह्युंडाई स्मॉर्ट प्लस रोबेक्स – २१५ एल कंपनीची पोकलैंड मशीनचे मालक आरोपी नामे- ७) लखन बेहलीया वय ३६ वर्ष रा. पाल चौक गोंदिया ८) टिप्पर क्रमांक एम.एच-३५ ए.एच. १४९९ चे मालक आरोपी आशिष नागपुरे वय ३७ वर्ष, रा. कुडवा गोंदिया, ९) टिप्पर क्रमांक एम.एच-३५ ए. जे. २९०६ चे मालक आरोपी प्रकाश फुन्डे वय ५५ वर्ष रा.मरारटोली गोंदिया
१०) काळया पिवळया रंगाची हह्युंडाई स्मॉर्ट प्लस रोबेक्स – २१५ कंपनीची पोकलैंड मशीनचे मालक आरोपी नामे- सरफराज गोंडील वय ३५ वर्ष रा. सेल टॅक्स कॉलोनी गोंदिया असे असुन यातील आरोपी क्र. 7 ते 10 यांनी आरोपी क्र. 1 ते 6 यांना साईटोला घाट वैनगंगा नदी पात्रातून स्वतः चे आर्थिक फायद्याकरीता शासनाचा महसूल बुडवून वाळूचे अवैधरित्या उत्खनन करून वाळूची चोरी करून गुन्हा करण्यास सहाय्य केले आहे.
आरोपितांविरुद्ध पो. स्टे. दवनिवाडा येथे अप. क्र. 279/2022 कलाम 379, 109 भारतिय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी यांचे कडून 2 करोड 15 लाख 60,000/- हजार रुपयांचा अवैध वाळूसाठा व उत्खननाकरिता व वाळू चे वाहतुकी करिता वापरलेली वाहने जप्त केली आहेत. तसेच आरोपी 1 ते 6 यांना अटक करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास दवनिवाडा पोलीस करीत आहेत.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक, अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी देवळेकर यांचे नेतृत्वात नेमलेले विशेष पोलीस पथकामधील पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, पोलीस अंमलदार पो. हवा. सुजित हलमारे, पो. हवा. महेश मेहर, पो.ना. शैलेषकुमार निनावे, पो. शि. सन्नी चौरसिया, दया घरत यांनी केली आहे.