Saturday, December 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोठणगाव आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

गोठणगाव आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांची आकस्मिक भेट
गोंदिया : जि.प.उपाध्यक्ष तथा शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती इंजि. यशवंत गणवीर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्याती गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला रात्रीला आकस्मिक भेट दिल्याने चागंलीच खळबळ उडाली असून केंद्रातील अनागोंदी कारभारच चव्हाट्यावर आला आहे.
यावेळी माजी पं.स.सदस्य दिनदयाल डोंगरवार, जन आरोग्य समिती सदस्य तुलशिदास कोडापे उपस्थित होते. सदर भेटिदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर सांगोळकर व त्यांच्या पत्नी हे दोघे वरांड्यात तर शासकीय निवासस्थानी लाईट नसल्याने कनिष्ठ लिपिक श्रिवास्तव हे औषध रुममध्ये झोपलेले होते.अतिसंवेदनशील क्षेत्रात असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे असून ते सुद्धा मुख्यालयी राहत नाही. त्याचप्रमाणे रात्रपाळीला सांगोळकर व त्यांच्या पत्नी हे दोघेही व श्रीवास्तव हे ड्युटी नसताना सुद्धा दररोज रात्री आरोग्य केंद्रात राहतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक एएनएम ब्रदर असून त्याची 2.47 अशी ड्युटी असून तो ड्युटीवर हजर नव्हता. तालुका वैद्यकीय अधिकारी यांना फोन केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व एएनएम ब्रदर दोघेही दवाखान्यात आले. विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. ड्युटी चार्ट 20/11/2022 पासून बदललेला नाही, मग स्वत: तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार असताना अशी स्थिती तर तालुक्यातील बाकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काय परीस्थिती असेल असा प्रश्न चिन्ह आरोग्य यंत्रणे विषयी निर्माण होतो. परिचर सांगोळकर अपंग असून सुद्धा आपल्या पत्नीला सोबत घेऊन रात्री ड्युटी नसताना सुद्धा आपले काम करत आहेत आणि बाकीचे कर्मचारी फक्त पगारापुरता काम करत असल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे रात्री येणाºया रुग्णांचा उपचार होत नाही, रात्रपाळीत एकही नर्स ड्युटीवर राहत नाही, अशावेळी रात्रपाळीत एखादी महिला बाळंतपणासाठी आली तर तिचा उपचार करणार कोण? सदर प्राथमिक आरोग्य केंद्रातील या भोंगळ कारभाराला जबाबदार कोण आणि आरोग्य विभाग काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments