Wednesday, April 24, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोदिंंया जिल्ह्यात 66, अर्जुनी मोर. तालुक्यातील ४९ शेतकऱ्यांना वन जमिनीचे पट्टे वितरित

गोदिंंया जिल्ह्यात 66, अर्जुनी मोर. तालुक्यातील ४९ शेतकऱ्यांना वन जमिनीचे पट्टे वितरित

गोंदिया : शब्द पाळणारा नेता म्हणजे मा. डॉ.परिणयजी फुके. कित्येक वर्षा पासून प्रलंबित वन पट्टे देण्यासंबंधीत कामाला गती मिळाली.
ब। तालुक्यातील वन हक्क धारक ४९ शेतकऱ्यांना शेतीचे पट्टे वितरित करण्यात आले. मा. डॉ. परिणयजी फुके यांचे प्रतिनिधी म्हणून मा. श्री विजयभाऊ कापगते (तालुका अध्यक्ष, भाजपा, अर्जुनी मोर.), मा. श्री. लैलेशभाऊ शिवणकर (तालुका महामंत्री, अर्जुनी मोर. ), श्री. मुकेशजी जयसवाल, श्री राधेश्यामजी भेंडारकर (सभापती, नगरपंचायत अर्जुनी.), श्री संजयजी लंबकाने, जितेंद्र साळवे (जिल्हा सचिव, युवा मोर्चा गोंदिया), वैभव गहाणे (तालुका महामंत्री, युवा मोर्च्याचे), निखिल गायकवाड (युवा मोर्चा, अर्जुनी मोर.), जयवंत डोये, संजय समरीत आणि त्यांचे स्वीय सहाय्यक उपस्थितीत राहून त्यांनी पट्टे वितरित करण्यात आले.

मागील कित्येक वर्षांपासूनच्या रखडलेल्या वन हक्क जमिनीचे पट्टे वितरण करण्याचे काम संत गतीने सुरु होते. अर्जुनी तालुक्यातील वनहक्क समितीचे शिष्टमंडळ दि. २० जानेवारी २०२४ ला मा. डॉ. परिणयजी फुके अर्जुनी मोर. तालुक्याच्या दौऱ्यावर असताना भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी शेतकर्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक लावली व शेतकऱ्यांना वन हक्क जमिनीचे पट्टे जलद गतीने देण्याबाबद चर्चा झाली. जिल्हधिकाऱ्यां मार्फत शेतकऱ्यांना टप्या – टप्यामध्ये शेतजमिनीचे पट्टे देण्यात येईल याची ग्वाही दिली होती. मा.परिणयजी फुके यांच्या द्वारे मागील २ महिन्यापासून सतत जिल्हाधिकाऱ्यांशी पाठपुरावा सुरु होता. आज तो दिवस उजळला व तालुक्यातील ४९ शेतकऱ्यांना पट्टे देण्यात आले. सर्व शेतकऱ्यांनी मा. परिणयजी फुके यांच्या कामावर आनंद, समाधान व कृतघ्नता वेक्त केला आणि भविष्यात त्यांना ताकत देण्याचे बोलून दाखवले. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत की त्यांचे सुध्या पण पट्टे येणाऱ्या काळात मिळतील…
उर्वरित शेतकऱ्यांचे पट्टे जलद गतीने येणाऱ्या ६ महिन्यात देऊ व ज्यांचे प्रकरणे अपील झाले नाहीत त्यांचे आणि ज्यांच्या प्रकारणामध्ये मध्ये त्रुट्या आहेत त्या शेतकऱ्यांकडून कागद पत्रे मागवून प्रकरणे मार्गी लावण्यासंबंधात सूचना मा. डॉ. परिणयजी फुके यांच्याकडून प्रशासनाला करण्या आल्या, तसेच स्थानिक भारतीय जनता पार्टी च्या कार्येकर्त्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याचा आव्हान सुद्धा मा. फूकेजी कडून करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments