गोंंदिया : गोरेगाव तालुका सरपंच -उपसरपच संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रांम पंचायत मधे जिल्हा परिषद गोंदिया पाणी पुरवठा विभाग मार्फत जल जीवन मिशन चे कामे सुरू असुन ठेकेदार व अभियंता हे मनमर्जीने कामे करत असुन झालेल्या कामांचे देयेके देताना संबंधित ग्रांम पंचायत चे प्रमाणपत्र जोडल्या शिवाय देयेके देण्यात येऊ नये त्याचप्रमाणे तालुक्यातील ग्रांम पंचायत स्तरावरील कुशल- अकुशल कामांना मंजुरी देऊन गांवातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दयावे तालुक्यातील कित्येक गांवात अंगणवाडी सेविका, मदतनीस ची पदे रिक्त आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील अंगणवाडीत शिकत असलेले लहान मुलांना मुलभूत सुविधा पासुन वंचित राहावे लागत आहे याकरिता रिक्त असलेले सर्व पदे त्वरित भरण्यात यावे तालुक्यातील कित्येक तलाठी सांझ्यामधे कोतवाल ची पदे मागील पाच वर्षांपासून रिक्त आहेत व गांवातील पोलिस पाटील हे पदे सुध्दा मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने गांवातील शालेय विद्यार्थ्यी व नागरिकांना पाच किलोमीटर लांब जाऊन पोलीस पाटील चे शैक्षणिक व इतर कामांकरिता लागणारे प्रमाणपत्र आनावे लागते
अशा विविध मागण्याना घेऊन तालुका सरपंच -उपसरपच संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी गोंदिया बेलपत्रे मॅडम,उपमुख्यकार्यकारी अधिकारी जि प शितल पुंड, जिल्हा परिषद चे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बेलपत्रे, गोरेगाव पंचायत समिती चे सभापती मनोज बोपचे, तहसीलदार गोरेगाव, पंचायत समिती गोरेगाव चे गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांना निवेदन देण्यात आले
यावेळी तालुका सरपंच -उपसरपच संघटनाचे अध्यक्ष नरेंद्र कुमार चौरागडे सरपंच मोहाडी, उपाध्यक्ष विजय बिसेन सरंपच हिरापुर, सचिव अरूण बिसेन सरंपच झांजिया,जिल्हा महिला प्रमुख-वर्षाताई पटले सरंपच लिंबा, तालुका महिला प्रमुख भुमेश्वरी रांहागडाले सरंपच चिंचगांव,पालेवाडा सरंपच मोनिका डाहरे,सोनी सरंपच हेमेश्वरीताई हरिणखेडे,तुमखेडा सरंपच रंजुकुमार येळे, मोहगाव सरपंच सुरजलाल पटले,संघटन प्रमुख यशवंत कावडे, उपसरपंच झनकलाल चौव्हाण, ओमकार कटरे, सरपंच अतुल मोटघरे,शेषकुमार रांहागडाले, सरपंच महेश चौधरी आदी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
गोरेगाव तालुका सरपंच संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे दिले निवेदन
RELATED ARTICLES