गोंदिया : शहर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेला 2 लाख 9 हजार रुपये किमतीचे दागिने मूळ मालकास न्यायालयाच्या आदेशाने तथा पोलिस अधिक्षकांच्या परवानगीने परत करण्यात आला. याप्रकरणातील तीन आरोपी 18 नोव्हेंबर 2022 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत.
शहरातील आरपीएफ वसाहतीत सुमित उईके हे 5 डिसेंबर 2022 रोजी सहकुटूंब बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 9 हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरी केले होते. याप्रकरणी शहर पोलिसांनी कलम 454, 457, 380 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सोनू गोपाल चव्हाण (38, रा. गौशाला वार्ड), राजेश भरत गायकवाड (40, रा. सेंदुरवाफा), मनिष ऊर्फ बुच्ची मनू कुलदिप (23, रा. दसखोली) यांना अटक केली होती. तसेच आरोपींकडून चोरी केलेले दागिने जप्त केले. दरम्यान 17 मार्च रोजी न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी सुमित उईके यांना पोलिस ठाण्यात बोलवून त्यांचे दागिने परत करण्यात आले. चोरी गेलेले दागिने परत मिळवून दिल्याबद्दल उईके कुटूंबीयांनी पोलिस विभागाचे आभार मानले. विशेष म्हणजे, याप्रकरणातील तीनही आरोपी हे 18 नोव्हेंबर 2022 पासून न्यायालय कोठडीमध्ये आहेत.
घरफोडीच्या गुन्ह्यातील 2 लाखांचे दागिने फिर्यादीस परत
RELATED ARTICLES