चारचाकी वाहनाचा नियंत्रण सुटल्याने घडला अपघात
गोंदिया : देवरी-चिचगड रोडवर 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजता दरम्यान एका स्कॉर्पिओ वाहनाचे वेग अनियंत्रित होवून परसोडी येथील नाल्याच्या खाली भीषण अपघात झाला. या अपघातात एका 4 वर्षााच्या मुलीसह आई व आजोबाचा मृत्यू झाला. सदर वाहन देवरी मार्गे चिचगड कडे जात असताना वाहनचालकाचा नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत तिघेही चिकोटा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे हलविण्यात आले आहे. तपास चिचगड पोलीस करीत आहेत.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219