गडचिरोली : चार्मोशी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार करणार्या कुथेगाव येथील चार आरोपींना कुनघाडा वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी ८ मार्च रोजी अटक केली. विठ्ठल मेसो हलामी, गजानन बुधू पोटावी, सुधाकर डोकू उसेंडी, रामचंद्र येसू कड्यामी सर्व रा. कुथेगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.चितळ शिकार करणार्या अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना ९ मार्च रोजी प्रथम श्रेणी न्यायालय चार्मोशी येथे हजर केले असता न्यायालयाने सदर चारही आरोपींना ९ ते २३ मार्च अशी १४ दिवसांची न्यायालयाची कोठडी सुनावली आहे. न्यायालयाचे आदेशानुसार चारही आरोपींना कारागृह अधिकारी, जिल्हा कारागृह चंद्रपूर यांच्या सुपूर्द करण्यात आले.
कुनघाडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्या जंगल परिसरात चितळाची शिकार करण्यात आल्याची माहिती वनाधिकार्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वनाधिकार्यांनी कुथेगाव येथे ८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जाऊन संशयीत आरोपीच्या घराची पाहणी केली असता वन्यप्राण्याचे कापून तुकडे केलेले मास आढळून आले. याबाबत अधिक चौकशी करून मांस शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या साहित्य जप्त करून व पंचनामा केला. याप्रकरण अटक करण्यात आलेल्या विठ्ठल मेसो हलामी, गजानन बुधू पोटावी, सुधाकर डोकू उसेंडी, रामचंद्र येसू कड्यांना या आरोपीस वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून त्यांची चौकशी करून कबुली जबाब नोंदवून त्यांच्याविरुद्ध 0७६८९/१८२२0६ अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतार चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी सुनावली त्यामुळे त्यांना ताब्यात अधिक चौकशी केली असता आणखी सहा इसम सहभागाची असल्याची माहिती दिली.
सदर कारवाई कुनघाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. तांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुनघाडाचे क्षेत्रसहायक ए. एम. मडावी, पावीमुरांडाचे एस. पी. गव्हारे, मुरमुरीचे वनरक्षक वर्षा डी. मडावी, गणपूरचे वनरक्षक इंदूबाई आर. भेंडेकर, प. पावीमुरांडाचे पी. एम. कोराम, संगणक चालक नंदू वाघाडे व नमजुरांनी केली. पुढील तपास प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली वनविभागाचे सोनल भडके, कुनघाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. तांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जोगनाचे क्षेत्रसहायक आर. पी. धाईत, कुथेगावचे वनरक्षक एन. बी. गोटा हे करीत आहेत.
चितळाची शिकार; आरोपींना १४ दिवसांची कोठडी
RELATED ARTICLES