लाखनी येथील घटना : चूलतकाकावर गुन्हा दाखल
भंडारा : लाखनी येथे घराशेजारी राहणाºया किशोरवयीन चूलतकाकाने 6 वर्षीय पुतणीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावले व लैंगिक अत्याचार केला. सदर घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. वैद्यकीय अहवालावरून लाखनी पोलिसांनी चूलतकाकावर पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पीडित बालिका लाखनीतील एका नामांकीत शाळेत इयत्ता पहिलीत शिकते. मंगळवारी सकाळची शाळा असल्याने शाळा आटोपून ती घरी आली व दुपारच्या सुमारास अंगणात खेळत होती. दरम्यान घराशेजारी राहणाºया 16 वर्षीय चुलतकाकाने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी बोलाविले. यावेळी घरी कुणीही नसल्याची संधी साधून मुलीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान कुटूंब घरी आल्याने पिडीतेचा रक्तस्त्राव होत असल्याचे समजताच तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाºयांनी तपासले असता बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समजले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश गोसावी, पोलिस हवालदार सुभाष राठोड, पोलिस शिपाई विठ्ठल हेडे व महिला पोलिस हवालदार मनीषा खेडीकर यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन पीडितेस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने आपबिती सांगितले. पिडीतेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तथा वैद्यकीय अहवालावरून चूलतकाकावर कलम 376 (1), 376(एबी) भादंवि तथा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे सहकलम 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले आहे.
चॉकलेटचे आमिष देऊन बालिकेवर अत्याचार
RELATED ARTICLES