गोंदिया. दोन वाहनांत जनावर कोंबून नेणारे वाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी थांबवून ते पोलिसांच्या मदतीने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले.
शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गोरेगाव गटाच्या कार्यकर्त्यांना 30 जुलै रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास गोरेगाव ते तिरोडा रस्त्यावरील कुऱ्हाडी नाका चौकात वाहनांत कोंबून जनावर नेण्यात येत असल्याने दिसले. त्यांनी 1 बोलेरो पिकअप सीजी 407 वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता त्यात 13 गायी आढळून आल्या. तर दुसऱ्या वाहनात पाच म्हशी कोंबलेल्या अवस्थेत होत्या. याची माहिती तातडीने गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पोहोचून वाहन चालकांची चौकशी केली. त्यानंतर दोन्ही वाहन पोलिस ठाण्यात नेवून गुन्हा दाखल करण्यात आला. जनावर गौशाळेत रवाना करण्यात आले.
जनावर तस्करीचे दोन वाहन पकडले
RELATED ARTICLES