Wednesday, May 22, 2024
Google search engine
HomeUncategorizedजबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

गंगाझरी पोलिसांची कामगीरी
गोंदिया : फिर्यादी कैलास भोलाराम उईके, वय 35 वर्ष, धंदा मजुरी, रा. पांगडी हे दिनांक 04.05.2023 रोजी सायंकाळी शहारवाणी येथील आठवडी बाजारमध्ये सामान आणण्याकरता गेलेले होते. सायंकाळी 19.00 वा. च्या सुमारास ते आठवडी बाजारातून सायकलने घरी परत येत असताना शहारवाणी तलावाजवळ आरोपी खेमचंद लखमीचंद मडावी, वय 28 वर्ष, रा. शहारवाणी व ओमकार मन्साराम पुसाम, वय 30 वर्ष, रा. शहारवाणी यांनी फिर्यादीला अडवून, त्यास मारहाण करून, त्याच्याकडील रोख रक्कम रुपये 2,400/- जबरीने चोरून नेले. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून दि. 05/05 2023 रोजी गंगाझरी पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम 392, 394, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्री. सुनील ताजने, यांनी पो. नि. श्री. महेश बनसोडे, पो. ठाणे गंगाझरी यांना जबरी चोरी गुन्ह्यातील गुन्हेगारांचा शोध घेऊन तात्काळ अटक करणेबाबत निर्देशित केले होते. या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे पो. ठाणे गांगझरी चे पोलीस निरीक्षक श्री. महेश बनसोडे, यांनी पो. ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकास याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. टिळेकर यांनी पो. ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने जबरी चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन आरोपी खेमचंद उर्फ मिथुन लक्ष्मीचंद मडावी, वय 28 वर्षे, ओमकार मंसाराम पुसाम, वय 30 वर्ष, दोघे रा. शहारवाणी , ता. गोरेगाव. जि. गोंदिया यांना ताब्यात घेऊन त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात केली. अटक आरोपींकडून फिर्यादी यांचे जबरी चोरी केलेले 1440/- रू. व त्यांनी नमूद गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल क्र. MH 35 M 8254 ही हस्तगत करण्यात आली. सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे निर्देशांन्वये पो. ठाणे गांगझरीचे पोलीस निरीक्षक श्री. महेश बनसोडे, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. श्री. पोपट टिळेकर, पो.हवा. मनोहर अंबुले, राकेश भुरे, पो.ना. महेंद्र कटरे, पो.शि. श्रीकांत नागपुरे, राजेश राऊत, जितेंद्र बघेल यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments