Wednesday, October 30, 2024
Google search engine
HomeUncategorizedजागतिक जलदिनी ग्रामसभेत हर घर जल व ओडीएफ प्लस घोषित करण्याचा ठराव

जागतिक जलदिनी ग्रामसभेत हर घर जल व ओडीएफ प्लस घोषित करण्याचा ठराव

मुख्य कार्यकारी अधिकारी
शितल पुंड
गोंदीया : जागतिक जल दिन २०२३ निमित्त बुधवार २२ मार्च २०२३ रोजी जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीमध्ये जल जीवन मिशनचे काम पूर्ण झाले असल्यास गाव हर घर जल घोषित करणे तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ प्लस) च्या निकषाची पूर्तता केल्यास ग्रामसभा घेऊन बैठकीत ठराव करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी दिली.
जल जीवन मिशन या योजनेच्या निकषानुसार गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्थांना नळ जोडणीद्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमित करणे आवश्यक आहे.त्यानुसार गावात ग्रामसभेत बैठक घेऊन २२ मार्च जागतिक जलदिनी हर घर जल ची तसेच गावात हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस ) निकषांतर्गत गावातील सर्व कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या निकषाची पूर्तता केल्यास गावात ग्रामसभेत बैठक घेऊन ठराव पारित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
जिल्ह्यात तालुका व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण भागामध्ये पाण्याचे महत्व, वापर हाताळणी व पाण्याची बचत आदी याबाबत जनजागृती व्हावी या करीता दरवर्षी जागतिक जलदिन साजरा करण्यात येतो.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बुधवार दि.२२ मार्च २०२३ रोजी सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर जागतिक जलदिनानिमित्त जल जागृती करावयाची आहे.या जागतिक जलदिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत स्तरावर शालेय विद्यार्थ्यांची जल व स्वच्छता प्रभात फेरी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची परिसर स्वच्छता स्त्रोतांचे क्लोरिनेशन, प्रात्यक्षिक दाखवणे, पाण्याच्या टाकीची स्वच्छता करणे, जल जीवन मिशन अंतर्गत गावातील घरोघरी नळाद्वारे प्रतिव्यक्ती, प्रतिदिन ५५ लिटर पिण्याचे शुध्द पाणी मिळेल यादृष्टीकोनातून ग्रामस्थांच्या सहकार्याने नियोजन करणे. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच पिण्याच्या पाण्याची जागेची स्वच्छता करणे, पाऊस पाणी संकलन तसेच पाण्याचा साठा वाढविण्यासाठी गाव परिसरात पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविणे याबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात येऊन जलप्रतिज्ञा घेण्यात यावी असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
राज्य स्तरावरील मार्गदर्शक सुचनेनुसार जागतिक जलदिनी गावात ग्रामसभेत घेऊन जल जीवन मिशन अंतर्गत काम पूर्ण झालेल्या गावांनी हर घर जल ची घोषणा तसेच हागणदारी मुक्त अधिकची (ओडिएफ प्लस) निकषाची पूर्तता केलेल्या गावांनी हागणदारीमुक्त अधिक गाव घोषित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) नरेश भांडारकर , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
http://panchyatkhabar.com/wp-content/uploads/2023/03/ad1-e1679401545250.jpg

Most Popular

Recent Comments