Thursday, April 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedजिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्वारी : चेतना ब्राम्हणकर

जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्वारी : चेतना ब्राम्हणकर

गोंदिया : समाजाचा व राष्ट्राचा विकास करायचा असेल तर स्त्रियांनी चुल आणि मुल एवढ्या पूरतेच मर्यादित न राहता उच्च शिक्षण घेवुन जगाचा उद्वार केला पाहिजे. म्हणून तर म्हटलं जात “जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्वारी” असे प्रतिपादन भारत स्काऊट गाईडच्या जिल्हा समन्वयक चेतना ब्राम्हणकर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट गाईड, अथर्व बहुउद्देशिय संस्था, शिवछत्रपती बहुउद्देशिय संस्था व जिल्हयातील विविध संघटनाच्या संयुक्त विद्यामाने आंतराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल मरारटोली गोंदिया येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन अविनाश बजाज सचिव जिल्हा रायफल शुटींग असो., एन. एस. उईके राज्य क्रीडा मार्गदर्शक, अमर गांधी सहसचिव जिल्हा रायफल शुटींग असो., माजी शुभेदार रामदास तांडेकर, माधुरी परमार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकेतून ए. बी. मरसकोले, क्रीडा अधिकारी यांनी आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या उद्देश व 8 ते 25 मार्च 2023 या कालावधीत राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विशेष कार्य करणा-या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार एन. एस. ईके राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवचरण चौधरी, किसन गावळ, आकाश भगत, जयश्री भांडारकर, नरेंद्र कोचे, विर गहरे, विशाल ठाकुर, विनेश फुंडे, अंकुश गजभिये, अतुल बिसेन यांनी अथक प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments