गोंदिया : जिल्हयातील पोलीस ठाणे अर्जुनी मोर, ठाण्यास *“महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन”* म्हणुन नुकताच गौरव प्राप्त केलेला आहे. राज्य स्तरावरील समितीने *सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन*” घोषीत केले आहे. पो.स्टे.अर्जुनी मोर नी पुरस्कार प्राप्त करून देशात तसेच राज्यात गोंदिया जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. त्याअनुषंगाने गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. चिन्मय गोतमारे साहेब व पोलीस अधीक्षक मा. श्री. निखिल पिंगळे, साहेब यांच्या हस्ते अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 6/7/2023 रोजी सायंकाळी 19.00 वाजता करण्यात येवून उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी अंमलदार यांचे सत्कार करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे हस्ते विशेष शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम
RELATED ARTICLES