खर्रा, गुटखा खाऊन न थूंकण्याचे आवाहन*
गोंदिया : जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परीसरात आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात १५५ अधिकारी कर्मचारी सहभागी झाले. दरम्यान सर्वांनी आपले कार्यालय व कार्यालयीन परिसर स्वच्छ ठेवावा. गुटखा, खर्रा खावून कार्यालय परिसरात थूंकू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. एम. मुरूगानंथम यांनी केले. आज. (ता. 24) सकाळी 8.00 वाजता जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात श्रमदानातून स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले.
मतदान व तंबाखूमुक्तीची शपथ
लोकशाही परंपरांचे जतन करण्यासाठी निर्भयपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा तथा तंबाखू मुक्त भारत करण्याची यावेळी शपथ घेण्यात आली.
धुम्रपान आणि थूंकण्यामुळे होणाऱ्या आजारांसह स्वच्छता आणि आरोग्य या विषयांवर डॉ. नितीन कापसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदच्या संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
जिल्हा परिषदेत भिंतीवर तसेच आवरामध्ये थूंकल्यास होणार दंड!
जिल्हा परिषद ईमारत परिसरात गुटखा, खर्रा खावून थुंकणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. तर जिल्हा परिषदेत शासकीय कामानिमित्त बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी जिल्हा परिषद प्रशासकीय परीसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम. मुरूगानंथम यांनी केले आहे. तसेच जे बाहेरून येणारे नागरिक वरील नियमाचे उल्लंघन करतील त्यांचेवर 100 रुपये दंड आकारण्यात येईल असे सुद्धा सांगितले.