गोंदिया : आदिवासी विकास महामंडळ
प्रादेशिक कार्यालय भंडारा अंतर्गत येणा-या उपप्रादेशिक कार्यालय देवरी मधील आधारभूत किंमत योजने द्वारे हंगाम २०२३-२४ अंतर्गत शासनाच्या वतीने मंजूर झालेले पहिले अंभोरा येथील धान खरेदी केंद्राचे चे उद्घाटन महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथ अंभोरा आदिवासी संस्थेचे अध्यक्ष भारतसिंग दूधनाग यांचे हस्ते गुरूवार (ता.९ नोव्हेंबर) रोजी करण्यात आले.
सदर धान खरेदीच्या उद्घघाटन प्रसंगी देवरीचे उप प्रादेशिक व्यवस्थापक सदानंद राजुरे, अंभोरा संस्थेचे उपाध्यक्ष शिवकुमार राऊत, सचिव मधुकर शहारे, संचालक रघुनाथ कोटवार, प्रल्हाद दुधनांग, काशीराम कापसे, गौरसिंग करईबाग, शामराव मडावी, गोपाल उईके, मुरलीधरजी मस्के, काशीराम कापसे, रामकृष्ण सोनटक्के, कु.महानंदाताई घरत, निताबई घरत, मनोहर सोनकुकरा यांच्यासह अंभोरा संस्थे अंतर्गत येणा-या गावातील शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील पहिले धान खरेदी केन्द्राचे अंभोरा येथे शुभारंभ
RELATED ARTICLES