गोंदिया : जिल्ह्यात 11 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2023 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री व 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती हे सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. महाशिवरात्री निमीत्त प्रतापगड ता.अर्जुनी मोरगाव येथे दिनांक 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मोठ्या प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी यात्रेचे आयोजन केले जातात. आयोजित यात्रेमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 11 फेब्रुवारी पासून ते 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.