गोंदिया : जिल्हा परिषद गोंदियाचे नव्यावे रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम (भा.प्र.से.) यांचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गोंदिया व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महासंघ उपाध्यक्ष कमलेश बिसेन, जिल्हा सरचिटणीस कुलदीप कापगते, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे संतोष तोमर,सौरभ अग्रवाल,चित्रा ठेंगरी,तेजस्विनी चेटूले,सुभाष खत्री ,संतोष तुरकर मनोज गोंडाने, सचिन कुथे, भारती, वाघमारे,रामेश्वर जमईवार,दयानंद फटिंग,गायक ठाकूर, निशीकांत मेश्राम, सुरेश वाघमारे, योगराज बीसेन, साधना बिसेन, सरिता ब्रम्हावांशी, हंसराज गजभिये आदी उपस्थीत होते, ग्रामविकासाच्या योजना व अभियान तळागाळात पोहाचिविण्यासाठी संवर्ग आपले मार्गदर्शनात कशोशिने प्रयत्न करेल असे यावेळी जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आश्वत केले.
जि.प.सीईओ मुरगंनथम यांचे ग्रामसेवक संघटना व महासंघाने केले स्वागत
RELATED ARTICLES