Thursday, December 5, 2024
Google search engine
HomeUncategorizedजुगार खेळणाऱ्या 8 इसमांसह 1.23 लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार खेळणाऱ्या 8 इसमांसह 1.23 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा पथकाची जुगार अड्ड्यावर धाड कारवाई

गोंदिया : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना प्रमाणे व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंदया विरूद्ध प्रभावी धाड मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने 3 मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे स्था.गु. शा. येथील पथकाने रात्री 20 ते 21 वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण हद्दीतील नावटोला, नागरा शेतशिवार परिसरात सापळा रचून धाड कारवाई केली असता 52 तासपत्यावर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळ खेळणाऱ्या 8 इसमांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तासपत्त्यावर जुगार खेळ खेळणाऱ्या इसमांच्या ताब्यातून अंगझडतीत आणि फळावरील रोख रक्कम 22,500, एकूण 6 नग महागडे मोबाईल किमती 1 लाख रु. तसेच जुगार खेळण्याकरिता वापरावयाचे तासपत्तीचे 15 कॅट किमती 825 रु, एक गमछा किमती 100 असा एकुण 1 लाख 23 हजार 425 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी स्वप्नील रमेश झाडे, वय 27 वर्षे, रा. दुर्गा मंदीर जवळ, अंगुिर बगीचा कटंगी, गोंदिया, कुणाल उमेश राणे, वय 24 वर्षे,रा. कुडवा, गोंदिया, अलताफ शहीद राईन, वय 25 वर्षे, रा. रामनगर, गोंदिया, राजेंद्र सेवकराम लिल्हारे, वय 35 वर्षे, रा. टेमनी, गोंदिया, अमजद मंजुर तिघाला, वय 40 वर्षे, रा. अन्सारी बार्ड, गोंदिया, विवेक प्रकाश कांबळे, वय 30 वर्षे, रा. भिमनगर, गोंदिया, प्रदिप लक्ष्मीनारायण शेंडे, वय 32 वर्षे, रा. कन्हारटोली, जे.एम. स्कूल जवळ, गोंदिया, जितेंद्र धन्नालाल डहारे, वय 40 वर्षे, रा. कुडवा यांचेविरुध्द पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वरिष्ठांच्या निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पो.नि. दिनेश लबडे, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सदरची धाड कारवाई पो.उप.नि. महेश विघ्ने, पो.हवा. सोमू तुरकर,रियाज शेख,प्रकाश गायधने, पो.शि. संतोष केदार, चा.पो.हवा. लक्ष्मण बंजार, स्था.गु. शा. गोंदिया यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments