Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedजूनमध्ये होणार सेवानिवृत्त शिक्षकांचे जिल्हा अधिवेशन

जूनमध्ये होणार सेवानिवृत्त शिक्षकांचे जिल्हा अधिवेशन

जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ठराव
गोंदिया : राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीची सभा २९ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिल्हा अधिवेशन घेण्यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचार्‍यांचे जिल्हा अधिवेशन आगामी जून महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात घेण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे होते. मंचावर राज्य प्रतिनिधी पी.आर.पारधी, कोषाध्यक्ष डी.एल.गुप्ता, सचिव पी.एन.बडोले, शिक्षण विस्तार अधिकारी टिकाराम भेंडारकर, निशा वैष्णव, अंजली ब्राम्हणकर, महिला प्रतिनिधी रेखा बोरकर, मनु उके उपस्थित होते. सभेत अनेक प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेचे सभासद बनविणे, तालुका कार्यकारिणीचे गठन करणे, उपदानातून वसुल करण्यात आलेली संगणक, नक्षलभत्ता, एकस्तर व जादा वेतन राशी तसेच सातव्या वेतन आयोगाचा उर्वरित पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या हप्त्याची थकबाकी, जानेवारी व जुलै २०२३ च्या डी.ए.एरीअर्स थकबाकी देणे, गट बिमा राशिचे चेक देणे, सन २००२ पासून कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देणे, सालेकसा, तालुका कार्यकारिणीत अंशत बदल करणे आदि विविध विषयांवर चर्चा करून ठराव पारीत करण्यात आला. दरम्यान सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचार्‍यांचे जिल्हा अधिवेशन घेण्यावर एकमताने ठराव पारीत करण्यात आले. यामुळे जून महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य कार्यपालन अधिकारी व मुख्य लेखा वित्त अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे टॅब सुरू होताच सर्व देयके सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मिळणार, अशी माहिती देत सर्व देयके जि.प.गोंदिया येथे पाठविण्यात आल्याची शहनिशा करून घ्यावे, असे जिल्हाध्यक्ष खोब्रागडे यांनी सभेत सांगितले.

सभेत यांची उपस्थिती
आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत प्रामुख्याने ओ.के.बन्सोड, जे.बी.कर्‍हाडे, एच.बी.रहांगडाले, टी.एन.बहेटवार, एन.डी.करंजेकर, के.एस.घरजारे, डी.एस.बनकर, भारती त्रिलोकी, आर.डी.मासुरकर, रंजना डोंगरे, डी.एम.दखने, एस.बी.आष्टीकर, सी.बी.भगत, बी.बी.मेश्राम, टी.डी.बिसेन, डी.बी.शेंडे, गुप्ता यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हा संघटनेच्या वतीने महिला प्रतिनिधी चारधाम यात्रा करून परतल्यामुळे संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments