Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedटाकेझरी जंगल भागात पोलीस - नक्षल चकमक

टाकेझरी जंगल भागात पोलीस – नक्षल चकमक

गोंदिया : या अनुषंगाने श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. विजय भिसे, उपविभा गीय पोलीस अधिकारी आमगाव यांचे मार्गदर्शना खाली जिल्ह्यातील नक्षल प्रभावित महाराष्ट्र- मध्य प्रदेश, छत्तीसगड सीमाव र्ती भागात नक्षलवादी यांच्या दहशतवादी कारवा यांवर आळा घालण्याकरी ता जिल्हा पोलीस पथक अभियान राबवित आहेत . दिनांक 07. 04. 2023 रोजी . पोलीस अधीक्षक गोंदिया यांना गोंदिया महाराष्ट्र छत्तीसगड राज्याचे सिमा भागात पोस्टे सालेकसा अर्तगत बेवारटोला डॅम जंगल परीसरात भारत सरकार प्रतिबंधीत नक्षल संघटनेच्या स्वयंघोषीत नक्षल सशस्त्र दलम फिरत असल्याची गोपनिय खात्री शीर माहिती प्राप्त झाली होती. या अनुषंगाने नक्षल वाद्याकडुन अनुचीत प्रकार व हिंसक कार्यवाही वर प्रतिबंध घालण्याकरीता व परीसरात शांतता व सुव्य वस्था राखण्याकरीता पोलीस पथकास नक्षल विरोधी अभियान राबवि ण्याबाबत आदेश दिले होते.
दिनांक 07. 04. 2023 रोजी . मा. वरीष्ठांच्या आदेशा प्रमाणे सी -60 चव्हाण पथकांचे पोलीस अधिकारी, अंमलदार व छत्तीसगड राज्याचे पोलीस अंमलदार व मध्यप्रदेशचे हाक्स फोर्स चे अंमलदार असे पोलीस पथक नक्षल विरोधी अभियान मुरकुटडोह क्र 2 ग्राम- टाकेझरी लालघाटी जंगल परीसरात पेट्रोलिंग करीत असताना सुमारे 16.30 वा. ते 16.45 वा. दरम्यान समोर दोन इसम साध्या गणवेशात खांदयावर कुऱ्हाड घेउन व त्याचे मागे ठराविक अंतर ठेउन 3 स्त्रीया व 2 पुरुष गडद काळ्या हिरव्या रंगाचा गणवेश परीधान करुन हातात शस्त्रे घेउन पोलीस पथकाचे दिशेने येताना दिसले. पोलीस पथक पोजीशन घेवून असताना साध्या गणवेशात असलेले रेकी करणार्या नक्षलवादी यांना पोलीस असल्याचे लक्षात येताच ओरडत मागे पळाल्याने त्याच्या पाठीमागे येत असलेले सशस्त्र स्त्री व पुरुष नक्षलवादी यांनी त्याचा आवाज ऐकुण लगेच जिवे घेण्याचे उद्देशाने पोलीस पथकावर अग्नीशस्त्राने अंधाधुंद गोळीबार सुरु केला. पोलीस पथकास नक्षलवादी असल्याची खात्री झाल्याने पोलीस पथकाने सुध्दा नक्षलवा दयाना गोळीबारा दरम्यान आत्मसर्मपना विषयी आव्हान केले असता, नक्षलवादयानी पुन्हा पोलीस पथकातील अंमलदारावर अग्रीशस्त्रानी अंधाधुंद गोळीबार सुरुच ठेवला. पथकातील पायलेट गृप व फायरींग पार्टीतील अंमलदार यांनी आत्संरक्षणार्थ सुरक्षीत आड घेउन नक्षलवादयानी केलेल्या गोळीबाराला प्रतिउत्तर म्हणुन नक्षलवा दयाचे दिशेने गोळीबार सुरु केला. अंदाजे 20 ते 25 मिनीटे गोळीबार सुरु होता. पोलीस पथकाचा वाढता दबाव पाहुन नक्षल वादी जोरजोराने ओरडत धनदाट जंगलाचा फायदा घेत छत्तीसगड राज्याच्या सिमे लगतच्या भागाकडे पळुन गेले.
गोळीबार नंतर पोलीस पथकाने जंगला तील आजुबाजुचा परीसरा ची बारकाईने पाहणी केली असता नक्षलवादी यानी पळुन जाताना सोडुन गेलेले साहीत्य 1) एक काळया रंगाची गणवेशावरील टोपी ज्यास पाठी मागील बाजुस स्टील ची क्लीप असलेली जुनी वापरती. कि.00/- रू. 2) एक निळया रंगाचा रुमाल पांढया चौकटीचा कि.00/- रुपये 3) एक जोड काळया रंगाचा परागोन कंम्पनीची जुनी वापरती कि.00/- रुपये असे साहीत्य मिळुन आले. पोलीस पथकाद्वारे नक्षलवाद्यांवर आत्मसंरक्ष णनार्थ करण्यात आलेल्या गोळीबारात मोठया प्रमाणावर राऊंड फायर करण्यात आले असून नक्षल्यांची शोध मोहीम सुरू आहे. पोलीस पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार सुरक्षित आहेत. पोलीस पथकाद्वारे करण्यात आलेल्या गोळी बारात एक-दोन नक्षल वादी हे जखमी झाले असल्याची दाट शक्यता असून जखमी नक्षलवादी हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड सीमावर्ती, भागातील खेड्यात किंवा दवाखान्यात उपचार घेण्याची दाट शक्यता असल्याने जनतेला या द्वारे आव्हान करण्यात येते की सदर संबंधात माहिती प्राप्त झाल्यास पोलीस नियंत्रण कक्ष गोंदिया 07182 – 236100 , वॉट्स क्र. 91300 30548 यावर संपर्क साधून माहिती द्यावी.
सदर प्रकरणी पोलीस ठाणे सालेकसा येथे आज दिनांक 08.04.2023 रोजी पहाटे विशेष अभियान चव्हाण सी- 60 पथकाचे पो. उप. नि. श्री. राजधर पठाडे यांचे तक्रारी वरून भारत सरकार द्वारे प्रतिबंधित केलेल्या सशस्त्र नक्षल दलमचे अज्ञात नक्षलवादी यांचे विरुद्ध गुन्हा क्र. 90/ 2023 कलम 307, 353, 141, 143, 144, 147, 149, 120 ब, 114 भादवी, सहकलम 3/27 भारतीय हत्यार कायदा 1951 सहकलम 10, 16 ब, 18, 20, 23 बेकायदे शिर हालचाल प्रतिबंधक कायदा 1967 अन्वये दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव श्री. विजय भिसे हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली विशेष अभियान सी – 60 चव्हान पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार, छत्तीसगड राज्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार व मध्यप्रदेश राज्याचे हॉक्स फोर्स चे अधिकारी अंमलदार यांनी केलेली असुन मा. वरिष्ठांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments