मोरगाव अर्जुनी तालुक्यातील कोरंभीटोला येथील घटना
गोंदिया : जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील कोरंभीटोला येथे घडलेल्या अपघातात आज ०५ जुन रोजी दुपारी मायलेकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मृतक मोहन बांगरे हा आपल्या आईसह नातेवाईकांकडे जात असतांना कोरंभीटोला येथे भरधाव टिपर ने दुचाकी ला धडक दिली यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार मोहन बांगरे (२४) आणि पुष्पकला बांगरे (५५) असे मृतकांची नावे असुन ते दोघेही भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. घटनेची नोंद मोरगाव अर्जुनी पोलिसांनी घेतली आहे.
टिप्परच्या धडकेत मायलेकांचा मृत्यू
RELATED ARTICLES