Saturday, June 22, 2024
Google search engine
HomeUncategorizedठाकरे आणि राणे वाद विकोपाला

ठाकरे आणि राणे वाद विकोपाला

ठाकरे गटावर टीका करणारे राम कदम, राणे कुटुंबीय आणि शिंदे गटाचे लोक बिकाउ औलादीचे : खा. अरविंद सावंत

गोंदिया:- शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्षासाठी ज्यादिवसापासून न्यायालयीन लढा सरू झाला आहे. त्यादिवसांपासून ठाकरे गट आणि शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गट, भाजप या पक्षामधून ठाकरे गटा वर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. तसेच राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेसह भाजपच्या राणे पितापुत्रांकडून ही ठाकरे गटावर जहरी टीका केली जात आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि राणे हा वाद ही विकोपाला गेला आहे. राणे पित्रापुत्रांकडून वारंवार उद्भव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. या करिता सातत्याने निलेश राणे, नितेश राणे, राम कदम आणि शिंदे गटातील काही निवडक नेत्यांकडून टीका केली जाते हे टिका करणारे लोक बिकाउ औलादीचे असल्याची जहरी टीका खा. अरविंद सावंत यांनी केली. खा.सावंत आज बुधवार १ मार्च ला शिवगर्जना यात्रे निमित्त गोंदिया जिल्हाच्या दौ-यावर असतांना अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्ना लॉन येथे त्यांचा शिवगर्जना यात्रेनिमित्त संबोधन केल्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी सदर टीकास्त्र सोडले. भाजपच्या निलेश राणे यांनी ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी टीका करतांनी त्यांनी आधी आपला स्वतःचा भाजपत स्थान काय आहे त्याकडे पहावे असा टोला त्यांनी लगावला. आ. नितेश राणे हे ही आज भाजप ची बाजू घेत असले तरी विधानसभेत त्यांच्या आणि त्यांच्या वडीलांच्या सगळया फाईल्स या उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचून दाखवल्या होत्या. ती गोष्ट ही नितेश राणे यांनी लक्षात ठेवावी. आज स्वतःला शिवसेना समजत असलेले शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून तर किरण पावसकर यांच्यापर्यंत सगळे नेते उद्भव ठाकरे आणि ठाकरे गटावर टीका करत असतात मात्र ही सगळी मंडळी भुरटी चोर असल्याची टीका ही खा. अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलतांना केली. या प्रसंगी त्यांच्या सोबत शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाचे पूर्वी विदर्भ संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, गोंदिया जिल्हा प्रमुख शैलेष जायसवाल आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments