Tuesday, April 23, 2024
Google search engine
HomeUncategorizedडॉक्टरकडे २० हजार रुपये खंडणीची मागणी करणा-या सराईत गुंडांना गोंदिया शहर पोलीसांनी...

डॉक्टरकडे २० हजार रुपये खंडणीची मागणी करणा-या सराईत गुंडांना गोंदिया शहर पोलीसांनी १२ तासाचे आत केली अटक

खंडणी न दिल्याने गुंडांनी फिर्यादी डॉक्टरची मोटार सायकल पेटवून केली खाक

गोंदिया : फिर्यादी नामे डॉ.लोकेश चर्तुभुज मोहणे, वय ४३ वर्ष, रा. कृष्णपुरावार्ड, गोंदिया यांना राज ऊर्फ मारी, मुकेश तांडेकर ऊर्फ डाव, सुशांत जाधव व धर्मराज ऊर्फ धर्मा बावणकर यांनी दिनांक ०६/०२/२०२४ रोजी २०,०००/- रुपये खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी २०,०००/- रुपये खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी यांनी फिर्यादीचे ताब्यातील मोटार सायकल जबरदस्तीने हिसकावुन घेवुन गेले व मोटार सायकलला आग लावुन पेटवून दिल्याने फिर्यादीचे तक्रारवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप.क्र.५४/२०२४ कलम ३८४, ४३५, ३४ भादवी. अन्वये दिनांक ०८/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाचे तपासात पोलीस पथकाने अथक परिश्रम करुन गोपनिय सुत्राचे आधारे आरोपीतांचा शोध घेतला. आरोपी नामे १) राज ऊर्फ मारी सुशिल जोसेफ, वय २० वर्षे २) मुकेश ऊर्फ डाव विनोद तांडेकर, वय ३० वर्ष ३) सुशांत रतन जाधव, वय ३४ वर्षे, ४) धर्मराज ऊर्फ धर्मा दादी बावणकर, वय ३२ वर्षे सर्व रा. गौतमनगर, गोंदिया यांना दिनांक ०९/०२/२०२४ रोजी अटक केली. सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि.सोमनाथ कदम, पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत. सदर आरोपीतांना मा. मुख्य न्यायालय, गोंदिया यांचे समक्ष हजर केले असता मा.न्यायालय यांनी आरोपीतांना दिनांक २२/०२/२०२४ पर्यंत न्यायालयीन कोठडी मंजुर करुन सर्व आरोपीतांची जिल्हा मध्यवर्ती कारागृह भंडारा येथे रवानगी केली आहे.

सदरची कारवाई श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती रोहीनी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली डो. बी. पथकचे स.पो.नि. सोमनाथ कदम, स.फौ. घनश्याम थेर, पो.हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपाल भाटीया, निशिकांत लॉदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, संतोष भेंडारकर, म.पो.हवा. रिना चौव्हाण, पो.शि. अशोक रहांगडाले, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments