गोंदिया : नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून सहकारी विभागाने ६ टक्के व्याजासह पीक कर्जाची वसूली करावी, असे निर्देश काढले होते. मात्र हे आदेश शेतकर्यांना आर्थिक अडचणीत आणण्यासारखे असल्याने सर्वत्र रोष व्यक्त केला जात होता.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सदर व्याजासह वसुलीचे आदेश मागे घेण्यात यावे, यासाठी मागणी करण्यात आली होती. दोन्ही जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी या विषयाला गंभीरतेपणे घेऊन आणि शेतकर्यांचा रोष लक्षात घेत ही बाब उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या कड़े आणून दिली होती. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी त्वरित या विषयाची दखल घेत सहकार आयुक्त आणि सहकारी मंत्रालयाला निर्देशित केले। निर्देश मिळताच अवघ्या 8 तासात आयुक्तांनी तातडीने व्हर्च्युअल मिटिंग आयोजित करून सर्व बँकांच्या व्यवस्थापक व सहकार विभागाच्या अधिकार्यांकडून आढावा घेतला आणि सहकार मंत्रालयाने व्याजासह कर्ज वसुलीच्या निर्णयाला शिथिलता देऊन शेतकर्यांना मोठी दिलासा दिली. दिलेल्या सूचना मध्ये सहकारी आयुक्त व निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने कर्जाची परतफेड व्याजासह वसून न करता फक्त कर्जाची मुद्दल रक्कम मुदतीच्या आत वसूल करावी, असे सुचना केल्या आहेत.
शेतकर्यांना देण्यात येणारा बिन व्याजी कर्जावरील केंद्र व राज्य शासनाकडून बँकांना ३-३ टक्के या प्रमाणे व्याज दिला जातो. मात्र केंद्र शासनाने व्याजाची रक्कम डीबीटी तत्वावर शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सहकारी आयुक्तांने ३१ मार्चपुर्वी पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्यांकडून ६ टक्के व्याज आकारून वसूली करावी, अशा सुचना दिल्या होता. यामुळे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे कार्यालयाकडून सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ मधील अधिकाराचा वापर करून शेतकर्यांना देण्यात आलेला पीक कर्जाची परतफेड त्यावर आकारण्यात आलेल्या ६ टक्के व्याजाची रक्कम वजा करून फक्त मुद्दल कर्ज रक्कमेची वसुली करावी, असा सुचना दिल्या आहेत. तसेच शेतकर्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा आगावू लाभ देण्यात यावा व पुढील पीक कर्जासाठी पात्र ठरविण्यात यावे, असे निर्गमित परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व बँकांना सुचना देण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. आता पीक कर्ज मुद्दलच भरावी लागणार असल्याने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि राज्याचे माजी मंत्री आणि दोन्ही जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचे आभार मानले.