Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedडॉ.फुके यांच्या प्रयत्नामुळे आशा सेविकांच्या मानधनात वाढ, आता मिळणार 13 हजार रुपये...

डॉ.फुके यांच्या प्रयत्नामुळे आशा सेविकांच्या मानधनात वाढ, आता मिळणार 13 हजार रुपये दरमहा

डॉ.परिणय फुके यांनी राज्यातील यशस्वी सरकारचे मानले आभार

गोंदिया. मुंबई मंत्रालय येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी मांडलेली राज्यातील आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शासनाने मान्य करून त्यांच्या मानधनात 5000 रु.भरीव वाढ करून त्यांना न्याय देंण्याचा कार्य केलं आहे.

माजी राज्यमंत्री तथा गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके म्हणाले, आरोग्य यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात आज शासनाने वाढ करून न्याय दिला आहे. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. श्री.फुके म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी जनता दरबारात आशा सेविकांनी मानधन वाढीची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या हितासाठी सरकार लवकरच चांगली पावले उचलेल, असे आश्वासन मी त्यावेळी दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी सकारात्मक व समाधानकारक आश्वासने देऊन मानधनात वाढ करण्याचे मान्य केले होते. आज सरकारने आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय घेऊन महिला शक्ती मजबूत करण्याचे काम केले. आता ८ हजारहून आशा वर्कर्सच्या मानधनात ५ हजारांनी वाढ केल्याने त्यांना दरमहा १३ हजार रुपये मिळणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचे आशा वर्कर्समधून स्वागत होत आहे. आशा बहिणींनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments