Saturday, June 22, 2024
Google search engine
HomeUncategorizedड्रोनद्वारे भूमापन होऊन मिळकतींचे चौकशी काम सुरु

ड्रोनद्वारे भूमापन होऊन मिळकतींचे चौकशी काम सुरु

गोंदिया : गोंदिया नगर परिषद हद्दीतील क्षेत्राचे नगर भूमापन करण्याकरीता महाराष्ट्र शासनाचे 27 जुलै 2020 रोजीचे शासन निर्णयानुसार व जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पूणे यांचे 27 एप्रिल 2020 रोजीचे पत्रानुसार पथदर्शी प्रकल्पाकरीता निवड करुन ड्रोनद्वारे भूमापनाचे काम 2 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्ण झालेले आहे.
पथदर्शी प्रकल्प नगर परिषद गोंदियाचे हद्दीमध्ये समाविष्ट गावातील क्षेत्राचे व हद्दीचे सीमा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. ड्रोनद्वारे भूमापन झालेल्या क्षेत्राचे नकाशे उप अधीक्षक भूमी अभिलेख गोंदिया कार्यालयास प्राप्त झाले आहे. सदर नकाशा डिजीटल फॉर्मेटमध्ये असल्याने त्यांचा वापर करण्याकरीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पूणे यांचे कार्यालयाकडून आज्ञावली विकसित करुन प्रत्येक मिळकतींचे मालक/धारक यांची नोंद करुन आज्ञावलीद्वारे नकाशामध्ये प्रत्येक मिळकतींचा वेगळा नकाशा तयार केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मिळकतींचे क्षेत्र किती आहे, त्यांची हद्द व मालक/धारक यांची नोंद होणार आहे. यामुळे शहर वासियांचे नागरी हक्काचे संवर्धन होईल, शहराचे रस्ते, शासनाच्या मिळकती, खुल्या जागा, नाले इत्यादींच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण थांबविता येईल तसेच प्रत्येक मिळकत धारकांना त्यांचे हक्काचे पुरावे प्राप्त होतील. मिळकत धारकांना त्यांच्या मिळकतीवर कर्ज तसेच इतर सुविधा उपलब्ध होऊन नगर परिषदेची कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. यासाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख गोंदिया कार्यालयाकडून नगर परिषद हद्दीतील वार्ड क्र.9 ची निवड केली असून सदर वार्डामध्ये चौकशीचे काम सुरु आहे. तरी वार्ड क्र.9 मधील मिळकत धारकांनी आपल्या घरी/जागेवर कार्यालयाकडून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. तसेच मिळकतींचे धारक/मालक ठरविण्याकरीता नागरिकांनी त्यांचे मालकीयत जमिनीचे पुरावे जसे- सातबारा, खरेदी खत, कर पावती, भोगवटा प्रमाणपत्र (पट्टा) तसेच आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी इत्यादींची माहिती पुरवून शासनास सहकार्य करावे, असे उप अधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद बोकडे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments