गोंदिया : तिरोडा-यवतमाळ बसचा सोमवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील वडोदा जवळ अपघात झाला. बसमधील सर्व प्रवासी, चालक, वाहक सुरक्षित असून बसला धडक दिलेल्या कारचा चेंदामेंदा झाला आहे. कारमधील दोन व्यक्ती गंभीर आहेत. तिरोडा येथून यवतमाळकडे जाण्यासाठी सकाळी 6 वाजता सुटलेली बस क्रमांक एमएच 40 एन 9507 ने नागपूरजवळच्या वडोदा गावाजवळील हल्दीराम कारखान्यासमोर एक टिप्पर थांबली असताना धडक दिली. यावेळी बसच्या मागे येत असलेली कार क्र.एमएच 36 एच 1913 बसवर धडकली. कारच्या मागून येणाºया टिप्परने कारला धडक दिली. या विचित्र अपघातात कारमधील दोन व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. बसमधील 65 प्रवासी, चालक संदीप राठोड, महिला वाहक, चालक शहनाज सुरक्षित असून नागपूरचे महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी अपघातानंतर घटनास्थळी पोहोचले. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
तिरोडा आगाराच्या बसचा अपघात
RELATED ARTICLES