Friday, July 19, 2024
Google search engine
HomeUncategorizedतिरोडा बाजार समितीच्या सभापती जितेंद्र रहागंडाले, उपसभापती भूमेश्वर रहागंड़ाले

तिरोडा बाजार समितीच्या सभापती जितेंद्र रहागंडाले, उपसभापती भूमेश्वर रहागंड़ाले

गोंदिया : सहकार क्षेत्रातील महत्वपूर्ण घटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती समजला जात असून आज दिनांक १९ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापतीची निवडनुक संपन्न झाली.या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे सभापतीपदासाठी जितेंद्र रहांगडाले तर उपसभापती पदासाठी भूमेश्वर रहांगडाले यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. तर महाविकास आघाडीतर्फे सभापती पदासाठी ओम पटले तर उपसभापती पदासाठी दुर्गाप्रसाद कोठे यांचा अर्ज सादर करण्यात आलेला होता.यावर गुप्त मतदान घेण्यात यामध्ये सभापतीपदाकरिता जितेंद्र रहांगडाले यांना १८ पैकी १० मते व ओमप्रकाश पटले यांना ८ मते तसेच उपसभापती पदाकरिता भूमेश्वर रहांगडाले यांना १० मते तर दुर्गाप्रसाद कोठे यांना ८ मते पडली. यामध्ये सभापतीपदी जितेंद्र रहांगडाले उपसभापतीपदी भूमेश्वर रहांगडाले यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात सलग दुस-यांदा कृषी उत्पन्न बाजार समिती सत्ता स्थापन झालेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments