पत्रपरिषदेत गावकºयांची मागणी
सडक अर्जुनी : तालुक्यातील राका पळसगाव ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक एच. आर. शहारे यांच्या अनियमित कामकाजामुळे व गैरव्यवहारामुळे विकास कामांमध्ये अडचण निर्माण झाली आहे. ग्रामसेवक शहारे यांची बदली करून दुसरे ग्रामसेवक देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे. उपसरपंच मधुसूदन दोनोडे, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.
गत एक वषार्पासून ग्रामसेवक सहारे यांची बदलीची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. ग्रामसेवक यांच्या गैरवागण्याने ग्रामपंचायतचा विकास थांबल्याचा आरोपही दोनोडे व गावकºयांनी केला आहे. शहारे ग्रामपंचायतचे काम बरोबर करीत नाही. त्यांची बदली करावी यासंदर्भात खंडविकास अधिकारी यांना 25 मार्च 2022, 30 मे 2022, 30 जून 2022, 17 आॅगस्ट 2022 या तारखांना पत्र दिले. चारदा तक्रार करूनही खंडविकास अधिकारी शहारे यांच्यावर कार्यवाही करायला तयार नाहीत. त्यामुळे शहारेंचे मनोबल वाढत असून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. शहारे काम वेळेवर करीत नाही. कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायतला उपस्थित राहत नाही, कॅशबुकवर नोंदी नाहीत, लिहीत नाही. इलेक्ट्रिकचे बिल वेळेवर भरत नाही. घर टॅक्स आणि वसुलीला वेळ देत नाही. नागरिकांचे स्वच्छालयांचे अनुदान रक्कम देण्यात आलेली नाही. १५ व्या वित्त आयोगातून एक रुपयाही खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे गावचा विकास रखडून आहे. असा बेजबाबदार व गैरवर्तन गैरव्यवहार करणाºया ग्रामसेवक सहारे यांना तत्काळ बदली करावी अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या इशाराही ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य डुलीचंद चकाटे, महेंद्र हटेले, सुषमा दोनोडे, शिल्पा चांदेवार हटेले यांच्यासह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.
कोट…….
17 लाभार्थ्यांच्या शौचालयाचे अनुदान आजपर्यंत ग्रामसेवकांनी दिले नाही. ग्रामपंचायत शिपायाला 11 महिन्यांपासून वेतन दिला नाही. अशा निष्क्रिय व बेजबाबदार ग्रामसेवकाची गावात गरज नाही.
– अविनाश इरले, गावकरी.
कोट……..
ग्रामसेवकाच्या कारभाराला राका येतील ग्रामवासी कंटाळलेले असून त्यांची बदली ताबडतोब या गावातून करण्यात यावी तरच आमच्या गावचा विकास होईल.
– भास्कर पडोळे, गावकरी, राका.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219