Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedत्या व्हायरल व्हिडिओने घेतला वन मजुराचा बळी

त्या व्हायरल व्हिडिओने घेतला वन मजुराचा बळी

सुदाम किरसान आत्महत्या प्रकरण. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांवर ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल :

एकाला अटक,मुख्य आरोपी फरार.

नवेगावबांध दि.९.
पहिला व्हिडीओ कुणी व्हायरल केला याची माहिती काढून,आरोपीने वनमजुराला कामावरून काढण्याची धमकी दिली.आता आपली नोकरी जाणार या विवंचनेत असलेल्या वनमजुर सुदाम राखडु किरसान (वय५४वर्षे) राहणार मुंगली यांनी उद्यानातील टाकीवर गळफास घेऊन १७ एप्रिलला आत्महत्या केली होती.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात
तयार करण्यात आलेल्या एका महिला – पुरुषाचा व्हिडीओ वनमजुराच्या हातून चुकीने दुसऱ्यालाच पोस्ट झाला. परंतु, तो व्हिडीओ व्हायरल झाला.यासंदर्भात धमकी देणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याचा ॲट्रॉसिटीसह गुन्हा ६ मेला नवेगावबांध पोलिसांनी दाखल केला आहे.आपल्या पतीची आत्महत्या नसून हत्या आहे.असा आरोप सुलोचना सुदाम किरसान (५१) या मृतक सुदाम च्या पत्नीने दि.१८ एप्रिलला नवेगावबांध पोलिसात केलेल्या तक्रारीत केला होता. पोलिसांनी चौकशीचे चक्र वेगाने फिरवीत याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.तर मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सविस्तार वृत्त असे की,सुदाम राखडू किरसान (वय ५४) हे राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध येथील स्वागत कक्षात वनमजूर म्हणून नोकरिला होते. दररोज सकाळी ९ वाजता राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध येथे जात होते.
रात्री ९ वाजतापर्यंत ते घरी परतत होते.
भिवखिडकी येथील राहणारा अरविंद यशवंत नागपुरे (३५) व नवेगावबांध येथील एक महिला यांचा व्हिडीओ सुदामला मोबाइलने डोंगरवार यांच्या मोबाइलवर पाठवायचा होता.परंतु, तो व्हिडीओ चुकीने दुसऱ्याच्या मोबाइलवर सेंड झाला. त्यामुळे अरविंद नागपुरे याने ‘तू आमचा व्हिडीओ व्हायरल करून आमची बदनामी केली. तू येथे नोकरी कशी करतोस.मी तुला पाहून घेईन,’ असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. सोबत रूपेश हेमराज गोबाडे (३२) यानेसुद्धा धमकी दिली होती.
अशी माहिती संगणक चालक चांदेवार यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना दिली होती.धमकी दिली त्यावेळी सुदाम किरसान, डेपोमध्ये काम करणारा भोजू मळकाम आणि चांदेवार असे तिघेही हजर होते. भोजू मळकाम व सुदाम किरसान हे दोघेही धमकीला घाबरून थरथर कापत होते, अशी माहिती मृताच्या नातेवाइकांना मिळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.यावरून आरोपींची दहशत दिसून येते.

इकडे आपले पती व मुलांनी आपले वडील अजून घरी का आले नाही? याबाबत शोधाशोध सुरू केली होती. पण काही माहिती मिळाली नव्हती, शेवटी सुदामने आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली होती.

मृतकाच्या पत्नी आणि मुला-मुलीने नवेगावबांध उद्यानातील चौपाटीवर( संजय कुटी) दि.५मार्च २०२४ ला घडलेल्या एका पुरुष व महिलांच्या व्हिडीओ व्हायरल  घटनेची माहिती आणि त्यांच्या मृतक वडिलांना ४ जणांनी दिलेली धमकी आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करने याबाबद मृतकाच्या पत्नीने व मुलांनी आरोपीच्या नावा सहित नवेगावबांध पोलीसांना १८ एप्रिलला दिलेल्या तक्रारीत माहिती दिली होती.
या प्रकरणी ६ मे ला आरोपी अरविंद यशवंत नागपुरे (३५, रा. भिवखिडकी) व रूपेश हेमराज गोबाडे (३२, रा. नवेगावबांध) या दोघांविरुद्ध नवेगावबांध पोलिसांनी भादंविच्या कलम ३०६, ३४ सहकलम,३ (२), (५) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.या पैकी रूपेश हेमराज गोबाडे याला दि.८ मे ला अटक करण्यात आली,तर मुख्य आरोपी अरविंद यशवंत नागपुरे हा हे वृत्त लिही पर्यंत फरार आहे.

या प्रकरणात आणखी किती मासे गळाला लागतात?तेपोलीस चौकशीत निष्पन्न होईलच?
सध्या या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्याकडे आहे.
सदर बातमीदाराने दूरध्वनी वरून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केले असता, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.

१७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजताच्या सुमारास हिलटॉप गार्डनच्या परिसरातील पाण्याच्या टाकीवर इलेक्ट्रिक सर्विस वायरनी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतक सुदाम आढळले.सदर घटनेची माहिती तेथिल वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद पझारे यांनी पोलीसांना दिली.पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.

१५ दिवस लोटुनही नवेगावबांध पोलीसांनी आरोपी शोधुन काढले नाही.यामुळे नवेगावबांध पोलीसांची भुमिका संशयास्पद वाटत होती.
नवेगावबांध व परिसरातील जन माणसांत नवेगावबांध पोलीस सदर प्रकरण दडपत असल्याच्या खमंग चर्चा सुरु होत्या.
परंतु ६ एप्रिल ला गुन्हा दाखल झाला.एका आरोपीला अटक झाली व पुढे चौकशी सुरू असल्यामुळे या चर्चांवर पडदा पडला आहे.
———-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments