गोंदिया : सालेकसा – आमगाव मार्गा वरती शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान सोमवती चुडामन लिल्हारे वय 35 वर्ष या महिलेची हत्या करण्यात आली होती.या महिलेची मृतदेह तलावाजवळ शनिवारी सकाळी ग्रामस्थांना ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पोलीस उपनिरीक्षक अमोल मुंडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.या प्रकरणा संबंधित अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास करून अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली.अटक केलेल्या आरोपीचे नाव लखन मंगरू लील्हारे राहणार परसवाडा वय 39 वर्षे असे आहे. ही हत्या अनैतिक प्रेम संबंधातून करण्यात आली असे तपासामध्ये दिसून आले. अवघ्या 24 तासांमध्ये आरोपीला अटक केल्यामुळे तालुक्यामध्ये पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलीस उपनिरीक्षक अमोल मुंडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
त्या हत्याराला 24 तासात अटक
RELATED ARTICLES