गोंदिया. टायर कंपनीत काम करणाऱ्या मजुराचा शेकोटीतून भडका उडून भाजल्याने मृत्यू झाला. ही घटना गोरेगाव तालुक्यातील झांजिया येथे घडली मृताचे नाव सोहन रघुराम पांडो(वय 18, रा. कुमरी दर्री जि. कोरबा) असे आहे.
सोहन रघुराम पांडो हा तरूण गोरेगाव तालुक्यातील झांजीया येथे असलेल्या शाम बाबा टायर पेंट कंपनीत कामाला होता. थंडी असल्याने कंपनीच्या बाहेर असलेल्या आपल्या खोलीत त्याने शेकोटी पोटविली. लाकडे जळत नसल्याने त्याने त्यावर ऑईल टाकले. ते ऑईल टाकताच भडका उडाला. त्यात सोहनच्या छाती, पाठ, कंबर, डावा हात आणि दोन्ही हात जळाले. त्याच्यावर केटीएस रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालावरून गोरेगाव पोलिसांनी 16 डिसेंबर रोजी आकस्मिक मृत्युची नोंद केली. तपास पोलिस हवालदार जौंजाळ करत आहेत.
शेकोटीचा भडका उडाल्याने मजूर ठार
RELATED ARTICLES