Thursday, October 10, 2024
Google search engine
HomeUncategorizedदुचाकी-टिप्पर धडकेत बापलेकासह चौघे ठार

दुचाकी-टिप्पर धडकेत बापलेकासह चौघे ठार

गोंदिया : पिंडकेपार येथील नातलगाकडील लग्न सोहळा आटोपून दासगावकडे आपल्या गावी पत्नी, नातलगाची मुलगी आणि दोन मुलांना घेवून दुचाकीने निघालेल्या इसमास भरधाव येणाऱ्या टिप्परने धडक दिली. यात दुचाकीवर बसलेले दोन चिमुरडे आणि इतर बालिकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर जखमी इसमाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना गोंदिया नजीक असलेल्या मुर्री-भागोतटोला मार्गावरील ढाकणी परिसरातील सुनी चौकी जवळ आज शनिवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली. आदित्य बिसेन (वय 7), मोहित बिसेन (वय 11), कुमेंद्र बिसेन (वय 37) सर्व रा. दासगाव आणि आरवी कमलेश तूरकर (वय 5, रा. चुटिया) अशी मृतांची नावे आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात सर्वाधिक अपघात जड वाहनांच्या धडकेमुळे होत आहेत. मोठ्या प्रमाणात टिप्परची ये-जा असते. ते टिप्पर भरधाव वेगात दुचाकी चालकांना धडक देऊन पसार होतात. मध्यंतरी टिप्पर दिवसा चालविण्यावर बंधन आणण्यात आले होते. मात्र आता त्यांना वाट मोकडी करून देण्यात आली आहे. परिणामी, अपघातांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना आज, शनिवारी (ता. 1) दुपारी 11.30 वाजताच्या सुमारास घडली. तालुक्यातील दासगाव येथील कुमेंद्र बिसेन आपल्या कुटुंबियांसह गोंदिया शहरानजीक असलेल्या पिंडकेपार येथे लग्न कार्याकरिता नातलगाकडे आले होते. लग्न कार्य आटोपल्यानंतर दुचाकीने ते आज शनिवारी दुपारी आदित्य बिसेन आणि मोहित बिसेन, आरवी कमलेश तुरकर आणि पत्नीला घेवून भागवतटोला मार्गाने आपल्या गावाला जाण्यासाठी कुमेंद्र बिसेन निघाले होते. दरम्यान मुर्री-भागवतटोला मार्गावरील ढाकणी परिसरातील सुनी चौकीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच 35, के 0298 क्रमांकाच्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर कुमेंद्र बिसेन यांची पत्नी दूर फेकली गेली. मात्र, सात वर्षीय आदित्य बिसेन, 11 वर्षांचा मोहित बिसेन आणि 5 वर्षीय आरवी तुरकर या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुचाकी चालक कुमेंद्र बिसेन गंभीररित्या जखमी झाले. उपस्थितांनी तातडीने जखमी कुमेंद्र बिसेन आणि त्यांच्या पत्नीला गोंदियातील केटीएस शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान काही क्षणातच कुमेंद्र बिसेन यांचा देखील रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहे. घटनेनंतर मात्र ट्रक चालकाने पळ काढला. माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. मृतदेहांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments