Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedदुरुस्तीच्या ३१० कामांना प्रशासकीय मान्यता : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमरे

दुरुस्तीच्या ३१० कामांना प्रशासकीय मान्यता : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमरे

गोरेगाव व सालेकसा तालुक्याचा समावेश
४० लाखांच्या अंदाजपत्रकास मंजुरी
गोंदिया : पाणी टंचाई कार्यक्रम टप्पा दोन अंतर्गत सालेकसा व गोरेगाव तालुक्यातील सार्वजनिक विहीरीतील गाळ काढणे, सार्वजनिक विहीरीचे खोलीकरण, इनवेल बोर, नळ योजना विशेष दुरुस्तीच्या ३१० कामांना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमरे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर कामांवर ४० लाख रुपये खर्च होणार आहेत.
पंचायत समिती गोरेगाव येथील ११६ उपाय योजनांचे व पंचायत समिती सालेकसा येथील १९४ उपाय योजनांच्या कामाचे अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता, ग्रामिण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी शिफारशीसह पाणी टंचाई कार्यक्रम २०२२-२३ टप्पा-2 अंतर्गत सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे, सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण, इनवेल बोर, नळ योजना विशेष दुरुस्तीचे पंचायत समिती गोरेगांव येथील ११६ उपाय योजनांचे व पंचायत समिती सालेकसा येथील १९४ उपाय योजना असे एकूण ३१० कामांचे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी यांना सादर केले होते.
गोरेगाव तालुक्यातील ११६ कामांसाठी १५ लाख ६४ हजार ८६३ रुपये व सलेकसा तालुक्यातील १९४ कामांसाठी २४ लाख ३१ हजार ७८२ असे एकूण ३९ लाख ९६ हजार ६४५ रुपयांचे अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद यांनी सादर केले होते. या कामांना जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
सादर केलेल्या पाणी टंचाई अंतर्गत मंजुर आराखड्यातील पंचायत समिती गोरेगांव येथील ११६ उपाय योजनांचे व पंचायत समिती सालेकसा येथील १९४ उपाय योजनांच्या कामाचे अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत कार्यकारी अभियंता, ग्रामिण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी २६ मे २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली असल्याचे लेखी कळविले आहे.
पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत हिरापूर, हिरडामली, पिंडकेपार, सिलेगाव, पलखेडा, सटवा, गोंदेखारी, सोनेगाव, मेंगाटोला, हौसीटोला, वाघोली, बोरगाव, तेलनखेडी, बबई, घुमर्रा, हिराटोला, कमरगाव, दवडीपार, मोहाडी, गणखैरा, खाडीपार, चिल्हाटी, मुंडीपार, बाम्हणी, बोटे, मोहगाव (बु.), डवा, तिमेझरी, कटंगी (बु.), शहारवाणी, मोहगाव (ति.), मलपुरी, तेढा, तुमसर, म्हसगाव, आसलपाणी, निंबा व पिपरटोला (तानु) अशा ३८ ग्रामपंचायत मधील टोल्यामध्ये ही कामे घेण्यात येणार आहेत.
सालेकसा पंचायत समिती अंतर्गत भजेपार, बाम्हणी, बिजेपार, बिंझली, बोदलबोडी, दरबडा, दरेकसा, धानोली, गांधीटोला, गिरोला, गोर्रे, जमाकुडो, कडोतीटोला, कावराबांध, कोसमतर्रा, कोटजांभोरा, कोटरा, कुलरभट्टी, खेडेपार, खोलगड, लटोरी, लोहारा, मक्काटोला, मानागड, मुंडीपार, नान्हवा, नवेगाव, निंबा, पांढरवाणी, पाऊलदौणा, पाथरी, पिपरिया, पोवारीटोला, रोंढा, सातगाव, सोनपुरी, तिरखेडी, टोयागोंदी व झालिया अशा ४१ ग्रामपंचायत मधील टोल्यामध्ये ही दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत.
उपाययोजना राबवितांना दिनांक ३ फेब्रुवारी १९९९ चे शासन निर्णयात शासनाने घालुन दिलेल्या सर्व अटी, निकष व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. पाण्याच्या उपलब्धतेबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गोंदिया यांचेकडून प्रमाणपत्र घेण्यात यावे. सदरहु कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असली तरीही आवश्यक असल्यास सदरहू कामे घेण्यात यावी. मंजुर योजना त्वरीत पूर्ण करून व कार्यान्वीत करून सुरू होताच तसा अहवाल पाठवावा तसेच प्रगती बाबत साप्ताहिक अहवाल पाठवावेत. उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद, गोंदिया व तहसिलदार यांनी या कामावर नियंत्रण व देखरेख ठेवावे. वरिल प्रदान केलेल्या उपाय योजनांशी संबंधित सर्व माहिती तसेच शासनाने मागितलेली माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया यांची राहिल असेही आदेशात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments