सडक अर्जुनी। डुग्गीपार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवपायली या गावातील पोलीस पाटील सुरेश बोरकर यांना गावात नवीन महामार्ग व पुलिया बांधकाम अग्रवाल ग्लोबल कंपनी द्वारे सुरु असतांना त्याच्या गाड्यातून डिझेल चोरी करतांना देवरी पोलिस पथकाने हातोहात मुद्देमाला सह पकडले आहे.
तालुक्यात जवळच सशिकरन घाट व पहाडी असल्याने अनेकदा ट्रकचे अपघात होत असतात. पोलिसांनी चौकशी झाल्यावर गावचे पोलीस पाटील यांना देखरेखीकरिता सांगितले जाते. पण अपघात झालेल्या ट्रकचे लोखंड, गाडी मध्ये भरलेला किमती समान, त्रिपाल,बॅटरी, डिझेल, रस्सा अश्या अनेक वस्तू लंपास करतांना अनेकांणी बघितले आहे.
प्राप्त माहितीनुसार अग्रवाल ग्लोबल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात डीझेल चोरी ची देवरी पोलिश स्टेशन मध्ये तक्रार असतांना देवरी पोलिश हे पेट्रोलिंग करीत असताना पोलिश पाटील सुरेश बोरकर यांना ट्रक क्रं MH 35 AJ 2685 ह्या ट्रक मधून मासुलकशा घाटा मध्ये डीझेलची चोरी करतांनी रंगेहाथ पकड़ण्यात आले.
ह्या पुलिस पाटीलावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी अग्रवाल कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पांडे व संचालक मंडळाची आहे. सदर पुलिस पाटील यांना निलंबित करा. आणि आता पर्यंत देवपायली मुरदोली ससीकरणं घाट येथिल संपूर्ण साहित्याची झालेली चोरी ह्या वेक्तीच्या संगमताने झाले असल्याचे समजते आहे. अशी तक्रार जिल्हा अधीक्षक यांना करणार असल्याचे सांगीतले जात आहे.