Tuesday, May 21, 2024
Google search engine
HomeUncategorizedदेवरी येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोचे साहित्य भस्मसात

देवरी येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोचे साहित्य भस्मसात

गोंदिया : देवरी तालुक्यातील शेडेपार रोडवर पाणीटंकी नजिक असलेल्या साई इलेक्ट्रीकल्स या दुकानाला आज मध्यरात्री शॉर्टसक्रिटमुळे लागलेल्या आगीत लाखोचे साहित्य जळाल्याची घटना (दि.३) घडली. सदर शॉर्टसक्रिट विजेच्या दाबात सतत होत असलेल्या चढ उतारामुळे लागण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.
सविस्तर असे की. शेडेपार रोडवरील पाणीटंकीजवल स्व. मधुसूदन वंजारी यांचे साई इलेक्ट्रीकल्सचे दुकान आहे. या दुकानाचेवर वंजारी कुटंबीय राहते. काल मंगळवारी रात्री वंजारी कुटुंबीय दुकान बंद करून वर गेले. अचानक मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. या आगीची माहिती नगरपंचायत प्रशासनाला लागताच तत्काल अग्निशमन दलाला घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे ४ वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्यात यश मिळविले. परंतु,या आगीत दुकानातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याने वंजारी कुटुंबीयांवर मोठे आर्थित संकट ओढवले आहे.
दरम्यान, घटनास्थळावर सध्या विद्युत विभागाकडून आनियमित दाबाचा होणारा विद्युत पुरवठा कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. सतत होणारा विद्युत दाबातील चढउतार यामुळे अनेक विजउपकरणे बिघडण्याचा प्रकार मोठ्याप्रमाणवर होत असल्याचे बोलले जात आहे. यातूनच सदर प्रकार झाला असावा, असाही कयास लावला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments