Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedधवलखेडी येथील तलावाचे दुरूस्तीचे बांधकाम त्वरीत करा : जि.प.सदस्य उषाताई शहारे यांची...

धवलखेडी येथील तलावाचे दुरूस्तीचे बांधकाम त्वरीत करा : जि.प.सदस्य उषाताई शहारे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

गोंदिया : देवरी तालुक्यातील ककोडी जि.प.क्षेत्रातील चिपोटा ग्रा.पं.अंतर्गत येणा-या धवलखेडीयथील ल.पा.विभाग गोंदिया तलावाचे पार बांधकाम दुरूस्तीचे काम मागील दोन वर्षापासून थंड बस्त्यात आहे. गेल्या वर्षी लोकवर्गनी मधून तलावाची दुरूस्ती करण्यात आली होती या वर्षी तलाव दुरुस्त झाला नाही तर सेकडो शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे या विषयाला धरून या क्षेत्राचे जि.प.सदस्य उषाताई शहारे यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेमध्येमागणी केली होती तसेच वेडो वेळी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शुधा सांगण्यात येत होता पण तरी शुधा अजून या तलावाचे काम अपूर्ण पडलेले आहे. त्यामुळे या भागातील शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर मुद्दावर लक्ष घालून या धवखेडी तलावाचे दुरूस्तीचे बांधकाम त्वरीत करा अशी मागणी या क्षेत्राचे जि.प.सदस्य उषाताई शहारे यांनी संबंधीत जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
यात सविस्तर असे की मागील दोन वर्षापासून धवलखेडी येथील तलावाचे पार तुटलेली आहे.त्यामुळे तलावात पाणी राहत नाही आणि वरून पावसाळ्यामध्ये शेतक-यांच्या पिकाची नुकसिन होण्याची शक्यता आहे कारण मागील वर्षीच या भागातील शेतक-यानी लोकवर्गणीतून या तलावाची तातपुरती दूरूस्ती केले होती. या गंभीर मुद्यावर ककोडी क्षेत्राचे जि.प.सदस्य उषाताई शहारे यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत या विषयाला धरून सभागृहाचे लक्ष केंद्रित केले होते. तसेच जिल्हा प्रशासनाकडे ६ जानेवारी २०२४ रोजी आपल्या पत्रातून मागणी केली आहे. यावेळी जिल्हा नियोजन समिती (डी.सी.पी.) मधून ३९.३५ लक्ष रूपयाचे निधी या तलावाच्या दुरूस्ती करीता मंजूर झाले असल्याचे असे सांगण्यात आले.
आता प्रश्न निर्माण होतोकी,लवकरच मानसुन ला सुरूवात होणार आहे. तरी देखील या धवलखेडी तलावाचे दुरूस्ती चे काम अद्याप सुरू झालेले नाही.त्यामुळे येत्या पावसाळ्यात या भागातील शेतक-यांनमध्ये तलाव फुटण्याची भिती राहणार आहे. तरी जिल्हा प्रशासन या तलावाचे दुरूस्ती कामाचे टेंडर लवकर करून या तलावाच्या दुरूस्तीच्या कामाची त्वरीत सुरूवात करावी अशी मागणी जि.प.सदस्य उषाताई यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.जेणे करूण शेतक-यांचे नुकसान होणार नाही. जर या तलावाच्या दुरूस्तीचे कामे त्वरीत सुरू करण्यात आले नाही तर या मागणीला धरून शेतक-यासोबत उपोषनावर बसण्याचा ईशारा जि.प. सदस्य उषाताई शहारे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments