Thursday, July 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedधान खरेदी संघटनेने शेतकऱ्यांशी प्रत्येक प्रश्नावर समन्वय साधून त्याच्या तोड़गा काढावा :...

धान खरेदी संघटनेने शेतकऱ्यांशी प्रत्येक प्रश्नावर समन्वय साधून त्याच्या तोड़गा काढावा : माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके

साखरीटोला येथे शासकीय धान खरेदी केंद्राचे उदघाटन थाटात
गोंदिया : महाराष्ट्र स्टेट को-आपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई अंतर्गत माँ गंगा शेती साधन सामुग्री सहकारी संस्था मर्या. साखरीटोला ता. सालेकसा येथील शामलाल दोनोंडे यांच्या गोडावून मधे आज सोमवार (29मे) रोजी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घघाटन गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले.
धान खरेदी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी मुख्य अतिथि म्हणून अध्यक्ष स्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती आमगावचे सभापती आणि भाजप जिलाध्यक्ष केशवभाऊ मानकर, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सचिव व माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार भेरसिंगभाऊ नागपुरे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजयभाऊ शिवणकर, भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र (बाळाभाऊ) अंजनकर, शंकर भाऊ मडावी, काशीराम हुकरे, जिप सदस्य सौ. वंदना ताई काळे, जिप सदस्य सौ. उषाताई मेंढे, सौ. लताताई दोनोडे, श्रीकांत राणा, संस्था अध्यक्ष प्रह्लाद मेंढे, सचिव श्यामलाल दोनोडे, तुकाराम बोहरे, सुभाष हुकरे, रमेश चुटे, भजेपार सरपंच चंद्रकुमार बहेकार, परसराम फुंडे, श्रावण राणा आदि मान्यवर उपस्थित होते.
माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी आपल्या भाषणात धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त करून शेतकर्‍यांचे अभिनंदन केले.
श्री.फुके म्हणाले, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले प्रयत्न व प्रगत काम करत आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल शासकीय दराने खरेदी करता यावा यासाठी धान खरेदी वाढविण्यात येत आहे. संघटनेने शेतकऱ्यांशी प्रत्येक प्रश्नावर समन्वय साधून त्या सोडवायला हव्यात, असे ते म्हणाले. संस्थेने धान खरेदीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांना लाभ देण्यासाठी काम केले पाहिजे. बारदान्याच्यी काळजी करू नका.
धान खरेदी करताना गोदामात धान ठेवण्यास काही अडचण आल्यास येत्या वर्षभरात नवीन गोदाम बांधण्यात येईल, असे माजी पालकमंत्री म्हणाले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक प्रल्हाद मेंढे, शामलाल दोनोंडे, संजय दोनोंडे, दीपक मेंढे, भुवन कोरे, खेमराज बागडे, राजकुमार थेर, कुवरलाल बावनथडे, मिलिंद गजभिये, पुरणदास चुटे, उर्मिला दोनोंडे, केसरबाई बावनथडे, ग्रेडर आनंदकुमार मेंढे, लिपिक सचिन सयाम आणि संचालक मंडल ने परिश्रम केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments