गोंदिया : गणखैरा येथे 5 ते 12 फेब्रुवारीपर्यंत संगीतमय शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ दुर्गा चौक गणखैरा येथे महिला मंडळ गणखैराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित संतोष आदमने (सरपंच गंणखैरा), अनु सरोजकर (उपसरपंच गंणखैरा), धाराबाई तुपट (माजी सरपंच गंणखैरा), नंदकिशोर तुप्पट (सदस्य ग्रा. पं. गणखैरा), पितम पारधी (सामाजिक कार्यकर्ता), खुन्नीभाऊ पारधी (माजी सरपंच गंणखैरा), राजेश राहांगडाले (अध्यक्ष भाजपा गणखैरा) व आदी मान्यवर उपस्थित होते. रोज संगीतमय प्रवचनाच्या माध्यमातून सर्व भक्तजनांना महाराजांनी शिवपुराण आपल्या श्री मुखातून सर्व श्रवण करविले. शिवपुराण कार्यक्रमासोबतच विविध मंत्राचा जाप करीत विविध भक्तिमय कार्यक्रम पार पाडण्यात आले. कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी भक्तजन महाप्रसाद ग्रहन करून शिवभक्तीत लिन झाले. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य बोध घेऊन तो आपल्या जीवनात सर्व ग्रामवासियांनी अंगीकारावा व जीवनात यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम करावे. अशा कार्यक्रमातून आपले ध्येय निश्चित करुन यश संपादन करावे असे प्रतिपादन रेखलाल टेंभरे यांनी केले.
धार्मिक भक्तीतून आपले ध्येय निश्चित करून यश संपादन करा : रेखलाल टेंभरे
RELATED ARTICLES