Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedनक्षलवाद्यांकरीता स्फोटके घेवुन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला अटक

नक्षलवाद्यांकरीता स्फोटके घेवुन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला अटक

नागनडोह जंगल परिसरात गोंदिया पोलीसांकडुन अटक
गोंदिया : डाव्या विचारसरणीच्या दहशतवादी कारवायांमुळे देशातील अंतर्गत सुरक्षेकरीता मोठा धोका असेलल्या व भारत सरकारने प्रतिबंधीत केले ल्या माओवादी-नक्षलवादी संघटना दरवर्षी जानेवारी ते जुन दरम्यान टि.सी.ओ. सी. कालावधी पाळून या दरम्यान प्रशासनाविरुद्ध बंड पुकारून अवैधरित्या स्फोटके व साहित्य गोळा करून देशविघातक विविध घातपाती घटना, विध्वसंक कृत्य घडवुन जनमाणसात दहशत पसरविण्याचे आणि आपला वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. या अनुषंगाने निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी जिल्हयातील नक्षल प्रभावित भागातील क्षेत्रात नक्षल हालचाली संबंधात गोपनीय यंत्रणा सक्रिय करून माओवादी नक्षलवाद्यांना मदत करणारे -सहकार्य करणारे यांची माहिती काढून नक्षल्यांचे दहशतवादी मनसुबे हाणून पाडण्या करीता जास्तीत जास्त माहिती संकलित करून दहशतवादी कारवायांवर आळा घालण्याचे निर्देश दिले होते.
या अनुषंगाने निखिल पिंगळे , पोलीस अधीक्षक गोंदिया. अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया,. विजय भिसे, उपवि भागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखा ली जिल्ह्यातील गोपनीय यंत्रणा सक्रिय करून माओवादी – नक्षलवादी यांना मदत व सहकार्य करणारे तसेच त्यांना साहित्य पुरवणारे यांची माहिती घेण्यात येत होती. या अनुषंगाने दिनांक ३१/०३/२०२३ रोजी गोंदिया जिल्हा पोलीस पथकास गोपनीय बातमी दाराकडुन माहिती प्राप्त झाली की,पो.ठाणे केशोरी अंतर्गत भरनोली लगतच्या नागनडोह जंगल परिसरात घनदाट जंगलात एक इसम हा पोलिसाविरुध्द घातपाती विध्वंसक कारवाई करण्याचे दृष्टीने माओवादी- नक्षलवादी यांना स्फोटके व इतर साहित्य देण्याकरिता जंगल मार्गाने जाणार आहे.
अशा प्राप्त खात्री शिर माहितीवरुन नक्षल्यां चा मनसुबा हाणून पाडण्यासाठी मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पथकाने स्फोटके घेवुन जाणार असलेल्या व्यक्ती ला जेरबंद करण्याचे दृष्टीने नागनडोह जंगल परिसरात सापळा रचून घनदाट जंगल परिसरात संशयीत रित्या पाठीवर काळया रंगाची बॅग घेवून जात असताना एका इसमास ताब्यात घेतले. ताब्यांत घेतलेल्या इसमाचे पाठी वरील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये १ डेटोनेटर, १ जिलेटीनची कांडी असे स्फोटके, साहित्य मिळुन आले.
सदर प्रकरणी इसम नामे किसन ऊर्फ क्रिष्णा मुर्रा मडावी, वय ३१वर्षे, रा. खारकाडी, पोस्ट- हेटी, ता. धानोरा, जि. गडचिरोली याचेविरुद्ध पो.ठाणे केशारी येथे अप. क्र.२७/२०२३ भारतीय स्फोटक पदार्थ प्रति. अधि नियम, बेकायदेशिर कृत्ये (प्रति.) अधिनियमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर ईसमास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी हे करीत आहेत.
गुन्ह्यातील आरोपी हा टीपागड दलम सक्रीय सदस्य असून याने सन २००९ मध्ये गडचिरोली पोलीसांविरुद्ध नक्षल वाद्यांनी मरकेगाव, हत्ती गोटा येथे केलेल्या हल्ल्या त सहभागी असल्याचे, तसेच सन २०११ मध्ये खोब्रामेंढा गोळीबार, मुरुमगाव येथील हल्ला, इत्यादी घातपाती हल्ल्यात सहभागी असल्याचे सांगितले आहे.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.दिनेश तायडे, सपोनि. संजय नाईक, पोउपनि श्रीकांत हत्तीमारे, पोहवा. भैय्यालाल किन्नाके , मुस्ताक सैय्यद, लक्ष्मण घरत, सुरेंद्र हिचामी, पोशि. आशिष वंजारी, पोना. उमेश गायधने, मोनेश तुरकर, यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments