Friday, June 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedनक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला

नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील पोमकें कटेझरी हद्दीतील कटेझरी-चारवाही जंगल परिसरात नक्षल्यांनी पोलिसांचा घातपात घडूवन आणण्याच्या उद्देशाने पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य जप्त करून नक्षल्यांचा घातपात उघळून लावला. सदर कारवाई गडचिरोली पोलिस दलाचे जवान व बीडीडीएस पथकाच्या जवानांनी आज १४ फेब्रुवारी रोजी केली.
नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविश प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने जंगल परिसरात जमिनीत पुरुरू ठेवतात. अशा प्रकारचे उपविभाग धानोरा अंतर्गत येत असलेल्या पोमकें कटेझरी हद्दीतील कटेझरी-चारवाही जंगल परिसरात नक्षल्यांनी पोलिसांचा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठय़ा प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवल्या खात्रीशिर माहिती मिळाली. यावरून पोलिस जवान व बीडीडीएस पथकाचे जवान सदर जंगल परिसरात नक्षलविरोध अभियान राबवित असताना जंगलात एका संशयीत ठिकाणी लपवून ठेवलेले स्फोटके व इतर साहित्यांच्या साठा आढळून आले. पोलिसांनी सदर साहित्य जप्त केले आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुत तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्वात पोमकें कटेझरीच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभियानात सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments