Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedनक्षल फायरींग : दोन पोलीस शहीद, एक जखमी

नक्षल फायरींग : दोन पोलीस शहीद, एक जखमी

छत्तीसगड राज्यातील बोरतलाव येथील घटना
गोंदिया : महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास 10-12 च्या संख्येत असलेल्या महिला पुरुष नक्षल्यांच्या टोळीने विनाशस्त्र चायपिण्याकरीता गेलेल्या दोन पोलिसांना ठार केल्याची घटना घडली.या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात सर्चिंग सुरु केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारला बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चाय पिण्याकरीता पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले असता आधीच त्या परिसरात दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी यांच्यावर गोळीबार केला.यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिसरा जखमी असून जखमी शिपायामुळेच सदर घटना पोलिसांना कळल्याचे वृत्त आहे.नक्षल्यांनी मोटारसायकलला आग लावून घटनास्थळावरुन बोपारा केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments