Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorized‘नविन फौजदारी कायदे’ विषयक जनजागृती कार्यक्रम साजरा

‘नविन फौजदारी कायदे’ विषयक जनजागृती कार्यक्रम साजरा

गोंदिया : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नविन फौजदारी कायदे’ कायदेविषयक साक्षरता शिबीर निमित्ताने 31 मे 2024 रोजी जिल्हा न्यायालय गोंदिया येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.टी.वानखेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश-1 ए.एम.खान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सकलेश पिंपळे, तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.आर.मोकाशी, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वाय.जे.तांबोळी, चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.डी.वाघमारे व सर्व न्यायीक अधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘नविन फौजदारी कायदे’ कायदेविषयक साक्षरता शिबीर निमित्ताने सह दिवाणी न्यायाधीश सर्वश्री एस.आर.मोकाशी, वाय.जे.तांबोळी व एस.डी.वाघमारे यांनी भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता-2023, भारतीय साक्ष अधिनियम-2023 या नविन फौजदारी कायद्याची माहिती, येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय योजना तसेच आधीचे कायदे व आताचे कायदे यांचे तुलनात्मक व नविन बाबींविषयी सविस्तर माहिती दिली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.टी.वानखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता-2023 व भारतीय साक्ष अधिनियम-2023 या कायद्यांची अंमलबजावणी व इतर बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मंगला बंसोड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ॲड. सुजाता तिवारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी अधीक्षक पी.बी.अनकर, लेखापाल आलेशान मेश्राम, कनिष्ठ लिपीक ए.एम.गजापुरे, एस.एम.कठाणे, पी.एन.गजभिये, एस.डी.गेडाम, पी.डी.जेंगठे, के.एस.चौरे, एल.ए.दर्वे, शिपाई बी.डब्ल्यु.पारधी, आर.ए.मेंढे, सरतीमा भगत यांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments