Friday, July 26, 2024
Google search engine
HomeUncategorizedनागझिरा व्याघ्र प्रकल्पात १२ वाघा, १८ बिबटसह एकूण १९८५ प्राण्यांची नोंद

नागझिरा व्याघ्र प्रकल्पात १२ वाघा, १८ बिबटसह एकूण १९८५ प्राण्यांची नोंद

गोंदिया  : बौध्द पौर्णिमेची प्रकाशमय रात्र निसर्गप्रेमींसाठी पर्वणीची ठरली. दरवर्षी प्रमाणे बौध्द पौर्णिमेच्या दिवशी २३ मे रोजी  नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात प्राणी गणना करण्यात आली. दरम्यान गणना करण्यासाठी मचानावर सज्ज असलेल्या वन्यप्रेमी आणि यंत्रणेच्या अधिकार्‍यांना सर्वश्रेणीच्या वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. नागझिरा व्याघ्र प्रकल्पात १२ वाघासह एकूण १९८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे  नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन्यप्रेमींसाठी आगामी काळात आकर्षणाचा केंद्र राहणार, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.

बौध्द पौर्णिमेला चंद्राच्या उजेडात प्राणी गणना केली जाते. दरम्यान पिटेझरी, नागझिरा, उमरझरी, डोंगरगाव, बोंडे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, कोका या क्षेत्रात गणना पथक कार्यरत करण्यात आले. या गणना प्रक्रियेत वाघ, बिबट, रानकुत्रा, हरीण, अस्वल, रानडुक्कर, मुंगूस, रानगवे, निलगाय, सांबर, चितळ, वानर, मोर, साळींदर, रानमांजर, उदमांजर, भेटकी, तडस, हळद्या, कोकीळा, सनबर्ड, घार, चौसिंगा, पॅगोलियन, ससा, लाल तोंड्या माकड, गरूड, रानमांजर, रान कोंबडा आदि प्राणी पहावयास मिळाले. एंकदरीत नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर झोन परिसरात सर्व वर्गीय १९८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली. यामुळे नागझिरा व्याघ्रप्रकल्प परिसर वाघांसह इतर वन्यप्राण्यांच्या अधिवासाने समृध्द असल्याचेही समोर आल्याने वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.

अशी आहे प्राण्यांची संख्या

वाघ-१२, बिबट-१८, रानकुत्रे -८२, अस्वल -७५, रानडुक्कर-१२८, मुंगूस-६४, रानगवे-७२०, निलगाय,-७१, सांबर-५०, चितळ-११५, हरीण-१६, वानर-३८६, मोर-११६, साळींदर-७, रानमांजर-१, उदमांजर-१०, भेटकी-१६, हळद्या-१, कोकीळा-५, सनबर्ड-१, घार-१, चौसिंगा-३, लाल तोंड्या माकड-८१, गरूड-३, रानमांजर-१, रान कोंबडा-२ याप्रमाणे प्राण्यांची नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments