बहारदार सादरीकरण, मंत्रमुग्ध श्रोते
नागपूर : आत्ताचा काळ हा20/20 क्रिकेटचा आहे. कोणालाही 5 दिवस किंवा पूर्ण दिवसभर क्रिकेटची मॅच बघायला सवड नाही, तद्वतच 3 ते साडेतीन तासांचे संगीत नाटकही बघायला प्रेक्षकांना वेळ नाही.ही प्रेक्षकांची नाडी ओळखून ‘धडपडे’ नारायण जोशी यांनी, संगीत सौभद्र नच सुंदरी करू कोपा, या प्रवेशाचे उत्तम सादरीकरण, नुकतेच रघुजीनगर, नागपूर येथील, दिनेश विश्व या बालशिक्षण संस्थेत पालकांसमोर केले.
संस्थेच्या प्रमुख संचालिका, राज्य पुरस्कार प्राप्त विभावरी कुळकर्णी यांनी या प्रयोगाचे आयोजन पालकांसाठी केले. या प्रवेशातून संपूर्ण संगीत सौभद्र या, अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नाटकाचे, प्रेक्षकांना कळेल अशा पद्धतीने संपादन नारायण जोशी यांनी केले. या प्रवेशात किर्तनाचा थाट,नांदी,सूचकपद, तसेच,नभ मेघांनी आक्रमिले,नच सुंदरी करू कोपा,वद जाऊ कुणाला शरण, तसेच प्रिये पहा, यानाट्यपदांचे सादरीकरण करण्यात आले. श्रीकृष्णाच्या प्रमुख भूमिकेत दिग्दर्शक नारायण जोशी होते,तर, ज्येष्ठ कवयित्री सौं. रेखा ओमप्रकाश शुक्ला यांनी रूक्मिणीची भूमिका समरसून साकारली. उज्वला अंधारे यांनी कोकीळा व सूत्रधाराची जवाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. शालेय मुख्याध्यापिका यांनी सर्व कलावंतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आभार मानले. या कार्यक्रमाला प्रा.अविनाश देशपांडे, डॉ. अशोक काळे, श्री दिपक पट्टलवार,रजनी टेंभेकर,विजय बोरीकर, डॉ. शुभांगी जन या मान्यवरांसोबत बहुसंख्य पालक हजर होते.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219