शहराला लागून असलेल्या आशीर्वाद कॉलनी झुलेलाल कॉलनी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण
गोंदिया : या क्षेत्रातील नागरिकांनी प्रचंड विश्वास दाखऊन मला निवडून दिले आहे. त्यामुळे या मतदारांचे ऋण फेडणे शक्य नसले तरीही त्यांच्या उपकाराची जान म्हणून हव्या त्या सर्व सुखसुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देणे ही आपली प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्थानिक विकास निधीतून शहरालगतच्या आशीर्वाद कॉलनी व झुलेलाल कॉलनी येथे प्रत्येकी 3 लाख रुपये खर्चून बगीचा सौंदर्यीकरण व ओपन जिम साहित्य लावण्याच्या कामाचे लोकार्पण 21 मे रोजी सायंकाळी 7 वाजता जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्या हस्ते आशीर्वाद कॉलनीचे अध्यक्ष रमेशकुमार टहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य स्नेहा दिनेश गौतम, सरपंच फुलचुर टोला उषा देवेंद्र बावनकर, माजी सरपंच कोमल धोटे, उपसरपंच दिनेश चित्रे, मनुजा जिवंजा, भारती गावंडे, रवी बोधानी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला ताराचंद तोलानी, डॉ. अशोक प्रथ्यानी, अड. जयपाल नुनानी, जयदेव तुलानी, अनिल हांसेजा, मुकेश वाधवानी, विजय ज्ञानचंदाणी, सैतपाल हसानी, अमर चिमंनानी, हेमंत हरिरागाणी, कमल तंडाणी, एकता वाधवाणी, नीतू तंडाणी, सुषमा जिवंजा, सीमा गोलानी, संगीता टहीलयानी, तारू ज्ञान चंदाणी, कम्मो राजवानी, अनिता धेमनानी, रंजू धेमनानी, किर्ती गुप्ता, दिया संगतानी आदी उपस्थित होते.
नागरिकांना सुखसुविधा पुरविणे आपली प्राथमिकता : सभापती संजय टेंभरे
RELATED ARTICLES