Friday, October 11, 2024
Google search engine
HomeUncategorizedनाना पटोलेंच्या भावासह पाच जणांवर अखेर गुन्हा दाखल

नाना पटोलेंच्या भावासह पाच जणांवर अखेर गुन्हा दाखल

डॉ. साळवे यांचे अपहरण प्रकरण
गोंदिया  : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाऊ विनोद पटोले यांच्यासह पाच व्यक्तींवर डॉ. प्रमोद साळवे यांना गडचिरोली-चातगाव मार्गावरील बोदली गावाजवळ त्यांची गाडी अडवून अपहरण , मारहाण व शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता कलम ३४१, १४३, ५०४, ५०६ अंतर्गत सोमवार ६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ. प्रमोद साळवे यांची बहिण अल्का रामणे यांच्या नावाने धानोरा तालुक्यातील कटेझरी येथे असलेल्या राईस मिलची खरेदीचा तोंडी सौदा जेसा मोटवानी रा. देसाईगंज यांच्या मध्यस्थीने ५१ लाख रुपयांत करून रजिस्ट्री करण्याचा ठराव केला होता. दरम्यान, विनोद पटोले यांनी टप्प्याटप्प्याने २० लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, सहा महिन्यांची मुदत उलटून गेल्यानंतर त्यांनी मील व जमिनीबाबत कोणताही व्यवहार नसल्याने वारंवार विचारणा केली. परंतु, विनोद पटोले यांच्याकडून सकारात्मक विचार दिसून न आल्याने त्यांना वकिलामार्फत १६ जानेवारीला नोटीस पाठवून व्यवहार करा, अन्यथा सौदा रद्द झाला असे समजण्यात येईल व सौद्यापोटी देण्यात येणारी रक्कमही परत देण्यात येणार नाही, अशा आशयाची नोटीस विनोद पटोले यांना देण्यात आली. ३ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान डॉ. साळवे आपल्या गाडीसह चातगाववरून गडचिरोलीकडे कामासाठी येत असताना, बोदली राईस मिलजवळ मागेहून भरधाव वेगाने वाहन क्रमांक एमएच ३१ एफई ९०९७ अचानक समोर येऊन थांबली. या गाडीत पाच व्यक्ती होते. त्यांनी गाडीतून उतरून धमकी देऊन आपल्याला शिवीगाळ व अपहरणाचा प्रयत्न केला. यात विनोद पटोले यांच्यासह आरमोरी येथील काँग्रेसचे युवानेते छगन शेडमाके, माजी पोलीस अधिकारी दामदेव मंडलवार, नागपूर येथील सुमित कोठारी यांचा समावेश होता. त्यांनी राईस मिल आपल्या नावाने करून दिली नाही तर ‘काट डालूंगा, मार डालूंगा’ अशी धमकी दिली. तर सुमित कोठारी यांनी ‘राईस मिल जला देंगे’ व छगन शेडमाके यांनी ‘राईस मिलके साथ इसको भी जला दो’ अशी धमकी दिली. यावेळी दामदेव मंडलवार यांनी मोठ्याने ओरडून ‘गाडीत बसा’ असे म्हणाले. सदर घटनेमुळे घाबरून सोबत असलेल्या साथीदारांच्या मदतीने सरळ गडचिरोली पोलीस स्टेशन गाठून याबाबत रिपोर्ट दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी सुमित कोठारी, विनोद पटोले, छगन शेडमाके, दामदेव मंडलवार व एक अनोळखी व्यक्ती अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर व्यक्तींना पोलीस अटक कधी करतात, याकडे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments